हिवाळा स्पेशल मिक्स भाजी (Winter Special Mix Bhaji Recipe In Marathi)

#HV .. हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून खाण्याची मजा असते. घरी असलेले टोमॅटो, हिरवे वाटाणे, गाजर आणि ओला लसूण... मस्त चटपटीत आंबटगोड भाजी केलीय आज, संध्याकाळच्या जेवणात. .. आणि लगेचच पोस्ट पण करतेय.. करायला एकदम सोपी...

कुकिंग सूचना
- 1
गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, ओला लसूण स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे. कांदाही चिरून घ्यावा.
- 2
गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे. तेल गरम झाल्यावर, त्यात जीरे मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घ्यावे. नंतर त्यात कांदा आणि लसूण घालून, कांदा शिजेपर्यंत परतून घ्यावे. आता त्यात मटार टाकावे. आणि झाकण ठेवून एक वाफ आणावी.
- 3
त्यानंतर त्यात हळद, तिखट, धणे पूड घालून मिक्स करावे. आता त्यात गाजर आणि टोमॅटो टाकावे.
- 4
मिक्स करून आता त्यात चवीनुसार मीठ आणि गीला घालावा. त्याच प्रमाणे मॅगी मॅजिक मसाला टाकावा.
- 5
पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून शिजवावे. मध्ये एकदा झाकण काढून, भाजी फिरवून घ्यावी. भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करून, चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- 6
छान आंबटगोड मिक्स भाजी, जेवताना गरमागरम पोळी, भात सोबत सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)