कॅरोट-बीटरूट पराठा (Carrot Beetroot Paratha Recipe In Marathi)

टिफिन आणि नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी पौष्टिक रेसिपी.
कॅरोट-बीटरूट पराठा (Carrot Beetroot Paratha Recipe In Marathi)
टिफिन आणि नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी पौष्टिक रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम स्टफिंगचे सारण तयार करून घ्यावे. त्यासाठी मध्यम आचेवर कढईमध्ये तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी. जीरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालावे.
- 2
आता त्यात किसलेले बीट, गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- 3
त्यानंतर त्यात मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व भाज्या 2 ते 3 मिनिटे परतून घ्यावे.(भाज्या अर्ध्या कच्च्या शिजवून घ्याव्या.) सारण बाजूला ठेवून थंड करायला ठेवावे.
- 4
आता कणकेमध्ये तेल, मीठ आणि थोडे पाणी घालून कणिक मळून घ्यावी.
- 5
मळलेल्या कणकेची छोटी पोळी लाटून त्यात सारण भरून पोळीची किनार सर्व बाजूंनी दुमडून बंद करून घ्यावी.
- 6
कणकेच्या गोळ्याला थोडेसे पीठ लावून पोळी लाटून घ्यावी. गॅसवर ही पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तेल किंवा बटर लावून खरपूस भाजून घ्यावी.
- 7
सर्व्हिंग डिश मध्ये काढून गरमागरम पराठा चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावा. आपला कॅरोट-बीटरूट पराठा तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या (2)