पालक झुणका (Palak Zunka Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण पालक, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्यावे मग कांदा पण चिरून घ्यावे.
- 2
मग एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जीरे, खोबरे व चवीनुसार मीठ घालून.
- 3
जाडसर वाटून घ्यावे.
- 4
मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, घालून तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा परतून झाल्यावर त्यात वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतावे.
- 5
मिरच्या परतून झाल्यावर त्यात पालक कोथिंबीर घालून परतावे.
- 6
मग हे सर्व परतून झाल्यावर त्यात पाणी घालून उकळी येऊ द्या.
- 7
मग एक वाटी मध्ये बेसन पीठ चाळून घ्यावे मग त्यात हळद व थोडे पाणी घालून पातळ माळून घ्यावे मग हे मिश्रण उकळत ठेवलेल्या पाणी मध्ये घालून चमच्याने ढवळून राहवे
- 8
मग त्याचे वर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे आपला पालक झुणका तयार आहे एक प्लेट मध्ये काढून गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावे मस्त 👌
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
- अंडा फ्लावर ची रस्सा भाजी (Anda Flowerchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
- पपई सलाड (Papaya Salad Recipe In Marathi)
- भाज्यांचा कलरफुल पिझ्झा (Colourful Pizza Recipe In Marathi)
- तेल मध्ये फ्राय केलेले वांगे चे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)












टिप्पण्या