रगडा पॅटिस (ragda patties recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. आदल्या दिवशी सफेद वाटाणा भिजत घालायचा. दुसऱ्या दिवशी कुकर ला सफेद वाटाणा, तूर डाळ लावून घ्यायची आणि 4 शिट्या काढायच्या.
- 2
तूर डाळ आणि सफेद वाटाना एका पातेल्यात एकत्र केउन त्यात चवीपुरती मीठ, हळद, हिंग, चाट मसाला टाकून उकड काढून घ्यायचा. वरती कोथिंबीर शिवरून घ्यायची आणि मग मंद आचेवर गरम करत ठेवायचं.
- 3
बटाटा स्मॅश करून त्यात थोडं हिंग, हळद, चाट मसाला, मीठ टाकून गोल शेप देऊन तव्यावर ब्राउन होईपर्यंत बनवला.
- 4
रंगड्यावर दोन पॅटिस ठेवून त्यावर कांडा, टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची. मस्त पैकी शेव आणि लिंबू पिळून सर्व्ह करायचं.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12455590











टिप्पण्या