निलंगा राईस (rice recipe in marathi)

#रेसिपीबुक लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका ह्या पदार्थासाठी फेमस आहे... झणझणीत आणि चमचमीत अशी हि रेसिपी घराघरात बनते आणि ठेल्यावरपण तुफान विकली जाते... शिक्षणासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हे आवडीचे पक्वान आहे... comfort food आहे.. रेसिपी बघा आणि नक्की करून पहा ... गावाकडची आठवण...

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कुकर मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, अद्रक लसूण पेस्ट घालून परतावे.
- 2
सर्व निट परतले गेले की त्यात हळद, काळे तिखट, लाल तिखट घालून परतावे.मग त्यात बटाटा फोडी आणि मेथी पाने घालून २-३ मिनिटे परतावे.
- 3
हे सगळं परतून घेत असताना मसूर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्यात घालून एकजीव करून घ्या. आता गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून ढवळा आणि कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या काढून गॅस बंद करावा.
- 4
गरमागरम निलंगा राईसवर साजूक तुपाची धार सोडून सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)