निलंगा राईस (rice recipe in marathi)

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
लातूर

#रेसिपीबुक लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका ह्या पदार्थासाठी फेमस आहे... झणझणीत आणि चमचमीत अशी हि रेसिपी घराघरात बनते आणि ठेल्यावरपण तुफान विकली जाते... शिक्षणासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हे आवडीचे पक्वान आहे... comfort food आहे.. रेसिपी बघा आणि नक्की करून पहा ... गावाकडची आठवण...

निलंगा राईस (rice recipe in marathi)

#रेसिपीबुक लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका ह्या पदार्थासाठी फेमस आहे... झणझणीत आणि चमचमीत अशी हि रेसिपी घराघरात बनते आणि ठेल्यावरपण तुफान विकली जाते... शिक्षणासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे हे आवडीचे पक्वान आहे... comfort food आहे.. रेसिपी बघा आणि नक्की करून पहा ... गावाकडची आठवण...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२-३
  1. 2 वाटी तांदूळ
  2. 1/4 वाटीमसूर डाळ
  3. 2 टेबलस्पूनलातूरचे स्पेशल काळे तिखट
  4. 1/4 टिस्पून हळद
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1मोठा बटाटा मध्यम आकाराचे तुकडे
  8. 2मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
  9. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  10. 1टोमॅटो बारीक चिरून
  11. 1 टेबलस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  12. १मोठी वाटी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून
  13. 2 मोठे चमचे तेल
  14. गरजेनुसार पाणी
  15. 7-8कढीपत्ता पाने

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम कुकर मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, अद्रक लसूण पेस्ट घालून परतावे.

  2. 2

    सर्व निट परतले गेले की त्यात हळद, काळे तिखट, लाल तिखट घालून परतावे.मग त्यात बटाटा फोडी आणि मेथी पाने घालून २-३ मिनिटे परतावे.

  3. 3

    हे सगळं परतून घेत असताना मसूर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्यात घालून एकजीव करून घ्या. आता गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून ढवळा आणि कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या काढून गॅस बंद करावा.

  4. 4

    गरमागरम निलंगा राईसवर साजूक तुपाची धार सोडून सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
रोजी
लातूर
मी एक खादाडी 😊😁😜🙏
पुढे वाचा

Similar Recipes