सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका पॅन मध्ये 1 टीस्पून तेल टाकून त्यात कांदा खोबर खाकस भेंडी वेलची कलमी भाजून घ्या. आणि मग त्याची पेस्ट करून घ्यावी. आल लसूण कोथिंबीर ची पण पेस्ट करून घ्यावी.
- 2
मग मटण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. मग एका पातेल्यात तेल गरम करावे. मग मटणात तिखट मीठ हळद धने पूड गरम मसाला टाका आणि मग त्यावर थोड गरम तेल टाकून मिक्स करावे.
- 3
मग पातेल्यात पुन्हा तेल गरम करून त्यात आल लसूण कोथिंबीर पेस्ट टाका. मग कांदा खोबर ची पेस्ट टाका. आणि मिक्स करावे.
- 4
मग मसाला 5 मिनिट होऊ द्या. आणि मसाला झाला की त्यात मटण टाका. मिक्स करा आणि तेल सुटू द्या.
- 5
तेल सुटल की मग 1 1/2 ग्लास पाणी टाका आणि मग मटणा च पातेल कुकर मधे ठेऊन 4 -5 शिट्या लाऊन घ्या. आणि मग काढून घ्या. सावजी मटण तयार आणि वरून गरम मसाला आणि कोथिंबीर टाका म्हणजे मटणाला तवंग उमटेल.
- 6
आणि तयार आहे सावजी मटण.
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या (2)