खान्देशी भरीत (bharit recipe in marathi)

# कूकस्नप
हि रेसिपी मी कल्पना चव्हाण यांनी केली होती ती बघून केली आहे.खानदेशात हे भरीत खूप प्रसिद्ध आहे.लग्नात भरीत पूरी चार खास बेत असतो.
खान्देशी भरीत (bharit recipe in marathi)
# कूकस्नप
हि रेसिपी मी कल्पना चव्हाण यांनी केली होती ती बघून केली आहे.खानदेशात हे भरीत खूप प्रसिद्ध आहे.लग्नात भरीत पूरी चार खास बेत असतो.
कुकिंग सूचना
- 1
वांग भाजून घ्यावे. कांदा चिरून घ्यावा.
- 2
वांग गार झाल्यावर साल काढून घ्यावी.कोथिंबीर चिरून घ्यावी.खानदेशात बडगी मध्ये भरीत करतात.
- 3
हिरवी मिरची आणि लसूण पण भाजून घ्यावे.कांदापात वापरतात तिकडे पण मला मिळाली नाही.मी घरची लसूण पात वापरली आहे.हे सगळे साहित्य बडगी मध्ये घेऊन चांगले एकजीव होईपर्यंत कुटावे
- 4
कढईत तेल तापवून घ्यावे, त्यात जीरे आणि मोहरी, हिंग घालून घ्यावे.मग शेंगदाणे तळून घ्यावेत.नंतर कुटलेले वांग घालून मिक्स करावे.मीठ घालावे.एक वाफ काढावी आणि सव्ह करावे.कळणाची किंवा ज्वारीची भाकरी करतात पण मी तांदूळाची केली आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या