खान्देशी भरीत (bharit recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744

# कूकस्नप
हि रेसिपी मी कल्पना चव्हाण यांनी केली होती ती बघून केली आहे.खानदेशात हे भरीत खूप प्रसिद्ध आहे.लग्नात भरीत पूरी चार खास बेत असतो.

खान्देशी भरीत (bharit recipe in marathi)

# कूकस्नप
हि रेसिपी मी कल्पना चव्हाण यांनी केली होती ती बघून केली आहे.खानदेशात हे भरीत खूप प्रसिद्ध आहे.लग्नात भरीत पूरी चार खास बेत असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅम भरीत वांगी
  2. 2मध्यम आकाराचे कांदे
  3. 7/8लसूण पाकळ्या
  4. 6/7हिरवी मिरची
  5. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  6. 1 टिस्पून मीठ
  7. 1 टिस्पून लसूण पात (आ्पशनल)
  8. 4 टेबलस्पूनतेल
  9. 1 टिस्पून मोहरी
  10. 1 टिस्पूनजीरे
  11. 1/2 टिस्पून हिंग

कुकिंग सूचना

25मिनिटे
  1. 1

    वांग भाजून घ्यावे. कांदा चिरून घ्यावा.

  2. 2

    वांग गार झाल्यावर साल काढून घ्यावी.कोथिंबीर चिरून घ्यावी.खानदेशात बडगी मध्ये भरीत करतात.

  3. 3

    हिरवी मिरची आणि लसूण पण भाजून घ्यावे.कांदापात वापरतात तिकडे पण मला मिळाली नाही.मी घरची लसूण पात वापरली आहे.हे सगळे साहित्य बडगी मध्ये घेऊन चांगले एकजीव होईपर्यंत कुटावे

  4. 4

    कढईत तेल तापवून घ्यावे, त्यात जीरे आणि मोहरी, हिंग घालून घ्यावे.मग शेंगदाणे तळून घ्यावेत.नंतर कुटलेले वांग घालून मिक्स करावे.मीठ घालावे.एक वाफ काढावी आणि सव्ह करावे.कळणाची किंवा ज्वारीची भाकरी करतात पण मी तांदूळाची केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes