फाटलेल्या दुधापासून गुलाबजामुन (dudha pasun gulabjamun recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

लॉकडाऊनमुळे खवा बाहेरचा न वापरता घरीच फाटलेल्या दुधापासून काय करावे म्हणुन गोड पदार्थ करून पाहिला .👍

फाटलेल्या दुधापासून गुलाबजामुन (dudha pasun gulabjamun recipe in marathi)

लॉकडाऊनमुळे खवा बाहेरचा न वापरता घरीच फाटलेल्या दुधापासून काय करावे म्हणुन गोड पदार्थ करून पाहिला .👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मि.करण्यासाठी मुरण्यासाठी ४ ते ५तास
चार जण/ २० जामूनझाले
  1. 2 टेबलस्पून२चमचमैदा,
  2. 2 टेबलस्पून२चमच रवा
  3. २ कप पाणी,
  4. 2 टेबलस्पूनदुध
  5. १ लिटर दुधाचे पनीर,
  6. २ कप साखर,
  7. 1 टीस्पून वेलची पुड,
  8. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा
  9. 1 टीस्पून लिबांचा रस
  10. तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

३०मि.करण्यासाठी मुरण्यासाठी ४ ते ५तास
  1. 1

    फाटलेल्या दुधाचे पनीर कपड्यांमध्ये गाळुन पुर्ण पाणी काढून घ्यावे.नंतर १० मि चांगले मळून घ्यावे.वत्यात मैदा व रवा टाकावे.व तेही मळून घ्यावे.

  2. 2

    वरील मिश्रण एका कपड्यांमध्ये १५मि.झाकून ठेवावे.

  3. 3

    नंतर पिकांमध्ये बेकिंग सोडा व गरजेनुसार दुध वापरावे. वअगदी हातावर घेऊन आवडीनुसार गोळे करून घ्यावेत.

  4. 4

    पाक करण्यासाठी एका भांड्यात पाणी साखर एकत्र करून गॅसवर उकळायला ठेवावे व एकतारी पाक करून त्यात थोडा लिंबाचा रस व वेलची पूड घालावी व नंतर परत उकळी आणावी.

  5. 5

    तयार गोळे तेलात चांगले तळून घ्यावेत.नंतर ते पाकात सोडावे.

  6. 6

    ४ ते ५ तासानंतर गुलाब जाम तयार वरून सजावटीसाठी काजु, बदामाचे बारीक काप वापर करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

टिप्पण्या

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
गुलाबजाम च्या मिश्रणात बेकिंग सोडा जास्त टाकू नये सोडा जास्त झाला तर जामुन तेलात तळताना विरघळतात.

Similar Recipes