खानदेशी आमसूल कढी (khandeshi amsul kadhi recipe in marathi)

#KS4
#खानदेशी आमसूल कढी
महाराष्ट्रातील विविध प्रांतातील विविध पदार्थांची ओळख आपल्याला कुकपॅडच्या माध्यमातून होत आहे. विदर्भातून सध्या आपण खानदेशी पदार्थांचा दौरा आपण करत आहोत. पदार्थ अनेकदा तेच असतात परंतु बनवण्याची पद्धत निराळी त्यामुळे त्या त्या भागात ते विशिष्ट पदार्थ प्रसिद्ध होतात. आणि प्रत्येकाची पदार्थ बनवण्याची एक खासियत असते. आज मीसुद्धा तुमच्यासाठी एक खानदेशी रेसिपी घेवून आले आहे... खानदेशी आमसुलाची कढी.....याला आमच्याकडे साताराभागात आमसुलाचे सार म्हणतात. करण्याची पद्धतही वेगळी आहे. चला तर बघूया.....आमसुल कढी

कुकिंग सूचना
- 1
प्रथम आमसुले ५-६ तास कोमट पाण्यात भिजत ठेवावी, त्यातच गूळही घालावा. आले, लसूण, मिरची, बेसनपीठ काढून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरावी. कडीपत्त्याची पाने धुवून घ्यावीत.आले, लसूण, खोबरे वाटून घ्यावे.
- 2
आता भिजलेली आमसुले पाण्यातच चुरावीत, बी असेल तर काढून टाकावे. व मिक्सरवर फिरवून घ्यावे गूळाचे तुकडे राहिले असतील तर तेही बारीक होतील.त्यावरच बेसनपीठ टाकून एकसारखे करून घ्यावे. आता एक पातेले गॅसवर तापत ठेवून त्यामध्ये २-३ चमचे तूप घालावे. हिंग, जीरे, मोहरी, कडीपत्ता घालावा, तडतडले की मिरची घालावी१ मि. परतावे.
- 3
आता आले,लसूण,खोबऱ्याचे वाटण घालावे. हळद घालावी, आमसूल, गूळ, बेसनपीठाचे मिश्रण घालावे.लाल तिखट, मीठ घालावे, आवश्यकतेनुसार पाणी घालावे. कोथिंबीर घालावी.उकळू द्यावे. सतत हलवत रहावे.
- 4
३-४ मि. उकळी येवू द्यावी. गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवावे व सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या