केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#KS4
खान्देश स्पेशल रेसिपी...
जळगावात केळी उत्पादन जास्त. पूर्ण महाराष्ट्रात जळगावची केळी जातात. सहसा ही भाजी करत नाही. पण भरपूर केळी असताना त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी ही भाजी केली आहे.

केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)

#KS4
खान्देश स्पेशल रेसिपी...
जळगावात केळी उत्पादन जास्त. पूर्ण महाराष्ट्रात जळगावची केळी जातात. सहसा ही भाजी करत नाही. पण भरपूर केळी असताना त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी ही भाजी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2कच्ची किंवा साधारण पिकलेली केळी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1 टीस्पून जीरे
  5. 1/4 टीस्पून हिंग
  6. 1 टेबलस्पूनतिखट
  7. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  8. 1/2 टेबलस्पूनधणे-जीरे पूड
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टेबल स्पूनकस्तुरी मेथी
  11. कोथिंबीर
  12. 1 टीस्पून साखर
  13. मीठ चवीनुसार
  14. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा व टोमॅटो बारीक वाटून घ्यावे. केळ्याचे गोल काप करावे.

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे, कढीपत्ता व हिंग टाकून कांदा पेस्ट टाकणे.

  3. 3

    कांदा लालसर रंगावर परतल्यावर त्यात टोमॅटो प्युरी टाकून चांगले एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यावे. हळद, तिखट, गरम मसाला, धणे-जीरे पूड टाकून एकत्र करावे. साखर घालावी. १/४ कप पाणी घालून उकळी आणावी. केळीच्या फोडी टाकून हलवून घ्यावे. मीठ घालावे.

  4. 4

    केळी नीट शिजली की कसुरी मेथी व कोथिंबीर वरुन घालावी. भाजी हलवून घट्टपणा बघून पाणी टाकून एक उकळी आणावी. खूप छान लागते ही भाजी भाकरी, पोळी बरोबर.

  5. 5

    वरुन भाजीवर ताजी मलाई फेटून घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes