मटार बटाटा रस्सा भाजी (matar batata rassa bhaji recipe in marathi)

Priyanka Kulkarni @priyanka1
मटार बटाटा रस्सा भाजी (matar batata rassa bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे थोडे बारीक कापून घ्यावे.
- 2
एका पँन मध्ये थोडंसं तेल घालून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर होई परांत भाजावा.
- 3
मग त्यात खौलेला नारळ,दालचिनीचा तुकडा, मिरे, लवंगा, जीरे, बडिशेब घालून 2ते 3 मिनिट चांगलं परतावे नंतर गॅस बंद करावा. मिश्रण थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यावे.
- 4
गॅस वर भांड गरम करत ठेवावे.
- 5
त्यात 2 ते 3 चमचे तेल घालावे.
- 6
तेल थोड गरम झाल्यावर त्यात बारीक वाटलेला कांदा खोबऱ्याच मिश्रण घालावे आणि तेल सुटे पर्यंत चांगलं परतून घ्यावे.
- 7
मग त्यात लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद, धने जीरे पूड, मीठ, आलं लसूण पेस्ट घालावी व पुन्हा परतून घ्यावे.
- 8
नंतर त्यात पाहिजे तितकं पाणी घालून उकळावे.
- 9
मग त्यात चिरलेला बटाटा आणि वाटाणा घालावे व 10 ते 15 मिं चांगले उकळून घ्यावे.
- 10
मग एका लहान वाटी मध्ये कडून वरून कोथिंबीर घालावी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15415435



टिप्पण्या