भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी नीट धुऊन घ्यावी मग त्यांना मध्यभागी थोडेसे चिरावे.
- 2
मसाल्यासाठी एका फ्रायपॅन मध्ये थोडेसे तेल घालून त्यात उभा चिरलेला थोडासा लालसर होई पर्यंत परतून घ्यावा
- 3
मग त्यात किसलेले सुके खोबरे लवंगा काळी मिरी दालचिनीचा तुकडा दगडफूल आणि धने-जीरे घालून परतून घ्यावे
- 4
मिश्रण थंड झाल्यावर बारीक वाटून घ्यावे
- 5
वाटलेले मिश्रण एका लहान भांड्यात काढून घ्यावे आणि मग त्यामध्ये हळद तिखट काश्मिरी मिरची पावडर मीठ अर्धा चमचा धने पूड जीरे पूड छोटा गुळाचा खडा घालून मिश्रण एकजीव करावे
- 6
हे मिश्रण चिरलेल्या वांग्यांच्या मध्ये भरावे
- 7
गॅस वर एक मोठ पातेलं ठेवून त्यात थोडं तेल घालावे तेल थोडे गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावा
- 8
नंतर त्यात उरलेले मिश्रण घालून परतून घ्यावे
- 9
त्यामध्ये एक कप पाणी घालावे
- 10
मग त्यात चिरलेले बटाटे आणि वांग घालून परतून घ्यावे
- 11
दहा ते पंधरा मिनिटानंतर उकळी आल्यावर गॅस बंद करावा आणि वरून कोथिंबीर घालावी
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या