बटाटा वडा (पांढरे सारण) (Batata vada recipe in marathi)

Rashmi Joshi @Rashmij21
बटाटा वडा पांढर्या सारणाचा मस्तच लागतो. तिखट, आंबट, गोड अशा तिन्ही चवी मुळे चटकदार होतो. कृती अतिशय सोप्पी आहे व अगदी कमी वेळेत तयार होतात.
बटाटा वडा (पांढरे सारण) (Batata vada recipe in marathi)
बटाटा वडा पांढर्या सारणाचा मस्तच लागतो. तिखट, आंबट, गोड अशा तिन्ही चवी मुळे चटकदार होतो. कृती अतिशय सोप्पी आहे व अगदी कमी वेळेत तयार होतात.
कुकिंग सूचना
- 1
मध्यम आकाराचे बटाटे कुकर मध्ये 3-4 शिट्ट्या काढून उकडून घ्यावेत. गार झाल्यावर साले काढून मॅश करून घ्यावे. त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालावी. लिंबू रस, साखर, मीठ घालून एकत्र करुन घ्यावे.
- 2
एका वाट्यात बेसन, तांदूळ पीठ, मीठ,हिंग, ओवा,हळद व पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे. तेल गरम करत ठेवावे व पीठात 2 चमचे कडकडीत मोहन घालावे.
- 3
सारणाचे चपटे गोळे करून घ्यावे. बेसनात बुडवून वडे तळून घ्यावे. हिरवी मिरची, साॅस सोबत सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15992140

टिप्पण्या