बटाटा वडा (पांढरे सारण) (Batata vada recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

बटाटा वडा पांढर्या सारणाचा मस्तच लागतो. तिखट, आंबट, गोड अशा तिन्ही चवी मुळे चटकदार होतो. कृती अतिशय सोप्पी आहे व अगदी कमी वेळेत तयार होतात.

बटाटा वडा (पांढरे सारण) (Batata vada recipe in marathi)

बटाटा वडा पांढर्या सारणाचा मस्तच लागतो. तिखट, आंबट, गोड अशा तिन्ही चवी मुळे चटकदार होतो. कृती अतिशय सोप्पी आहे व अगदी कमी वेळेत तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
6-7 वडे
  1. 3-4मध्यम आकाराचे बटाटे
  2. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  3. 1 टीस्पूनलिंबू रस/आवडीनुसार
  4. 1 टीस्पूनसाखर/आवडीनुसार
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/2बेसन
  7. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठी
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. थोडा हिंग
  10. 1/4 टीस्पूनओवा
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    मध्यम आकाराचे बटाटे कुकर मध्ये 3-4 शिट्ट्या काढून उकडून घ्यावेत. गार झाल्यावर साले काढून मॅश करून घ्यावे. त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालावी. लिंबू रस, साखर, मीठ घालून एकत्र करुन घ्यावे.

  2. 2

    एका वाट्यात बेसन, तांदूळ पीठ, मीठ,हिंग, ओवा,हळद व पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे. तेल गरम करत ठेवावे व पीठात 2 चमचे कडकडीत मोहन घालावे.

  3. 3

    सारणाचे चपटे गोळे करून घ्यावे. बेसनात बुडवून वडे तळून घ्यावे. हिरवी मिरची, साॅस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes