पोटली समोसा (Potli samosa recipe in marathi)

#HSR
Holi special recipe
रेग्युलर समोसा ला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला .छान खुसखुशीत होतात. नक्की ट्राय करा.
पोटली समोसा (Potli samosa recipe in marathi)
#HSR
Holi special recipe
रेग्युलर समोसा ला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला .छान खुसखुशीत होतात. नक्की ट्राय करा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी बटाटे कुकर मध्ये उकडून घ्यावेत. गार झाल्यावर तुकडे करून घ्यावे.
- 2
धणे, जीरे व बडीशोप खलबत्यात जाडसर कुटून घ्यावे. आलं मिरची पेस्ट करून घ्यावी. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात कुटलेले धणे,जीरे व बडीशोप घालून परतून घ्यावे व त्यात आलं मिरची पेस्ट घालावी. छान परतून घ्यावे व त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात.
- 3
नंतर त्यात मीठ, गरम मसाला, आमचूर पावडर घालून नीट परतून घ्यावे.बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याची पाने घालून मंद आचेवर परतून घ्यावे. एका प्लेट मध्ये काढून गार करून घ्यावे
- 4
एका भांड्यात मैदा, मीठ, ओवा व तूपाचे मोहन घालून पीठ मध्यम सैल भिजवून घ्यावे. 1 तास मुरू द्यावे. नंतर गोळे करून पोळ्या लाटून घ्याव्यात. पोळी चे चौकोनी तुकडे करून घ्यायचे, त्यासाठी साइड कापून एका पोळी चे चार चौकोनी तुकडे करून घ्यायचे.
- 5
मधोमध सारण भरून बोटांच्या सहाय्याने सारण दाबून पोटली चा आकार द्यावा व नीट बंद करून घ्यावे. तळण्यासाठी तेल नेहमी कोमट असावं.कोमट तेलात पोटल्या टाकून low medium flame वर तळून घ्यावे.
- 6
हिरवी मिरची, खजूर चटणी बरोबर सर्व्ह करावे
Similar Recipes
More Recipes





टिप्पण्या