समोसे (Samose Recipe In Marathi)

#WWR
थंडीत गरम गरम मटार समोसे खाण्याची मजा काही औरच.मग तर करुया आपण.समोसा म्हणजे बटाटा तर आहेच पण त्याचबरोबर फ्रेश मटार घालून समोसे दहि चिंचेची चटणी बरोबर खायला मिळेल तर मग त्याची मजा काही वेगळीच.

कुकिंग सूचना
- 1
मैदा व कणीक एकत्र करून घ्या त्याच्यात मीठ आणि तेल कलोंजी घालून घट्ट पीठ मळून घ्या. वाळलेल्या पिठाला थोडंसं तेल लावून दहा मिनिटे ठेवा.
- 2
एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा त्यात थोडीशी हळद मीठ घालून मटार उकडून घ्या व त्यातला पाणी काढून घ्या. एका कढईत तेल घालून त हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट,उकडलेले मटार,
गरम मसाला,हळद, हिंग हे सर्व घालून गॅस बंद करून घ्या. आता यात उकडलेले बटाटे चवीनुसार मीठ लिंबाचा रस घालून सारण तयार करा. - 3
भिजलेल्या कणकेचा गोळा करून पोळी लाटून घ्या.पोळी मधुन कापून घ्या.
- 4
कापलेल्या पोळीचा कोन करून त्यात सारण भरून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मंद आचेवर समोसे तळून घ्या.गरम समोसे दहि चिंचेची चटणी बरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)