तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)

#TGR
विशेषतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अश्याप्रकारच्या धान्यांची भाकरी केली जाते. बहुदा बाजरीची भाकरी बऱ्याच भागात बनविली जाते.पण विषेत: तीळ लावून बाजरीची भाकरी "भोगी दिवशी " म्हणजे मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशीच भोगीच्या भाजीबरोबर करतात.. तर बघूया बाजरीची भाकरी 😊

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करायला ठेवावा. त्यानंतर परातीत साधारपणे एकते दोन भाकरीला लागेल एवढेच बाजरीचे पीठ चाळून घ्यावे. भाकरीसाठी घेतलेल्या पाण्यात 1½ टीस्पून (चवीनुसार) मीठ घालावे. हे मिठमिश्रित पाणी पिठामध्ये थोडे थोडे घेऊन पिठाचा गोळा करावा.
- 2
हा पिठाचा गोळा चांगला मऊ मळून घ्यावा, जेणेकरून भाकरी व्यवस्थित थापली जाते. एका भाकरीला लागेल एवढा गोळा घेऊन, हातावर थोडा चपटा करून त्याला दोनीही बाजूने तीळ लावावे. त्यानंतर परातीत पीठ पसरवून हलक्या हाताने भाकरी थापावी व थापता थापता भाकरी गोल फिरवावी. परतीला भाकरी चिकटू देऊ नये.
- 3
पिठाची बाजू वर करून भाकरी गरम तव्यावर टाकावी, किंचित गरम झाली की पाणी लावावे. पाणी सुखले की, उलथन्याने भाकरी उलटावी. त्यानंतर खालच्या बाजूने भाकरी खरपूस भाजली की, उलथन्याने तव्यावरून काढून गॅसच्या आचेवर छान भाजावी. एकदम टम्मकन फुगते.
- 4
गरमागरम "तीळ लावलेली बाजरीची भाकरी" भोगीच्या भाजी सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या