शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)

#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे.
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे.
कुकिंग सूचना
- 1
मिरच्यांचे दांडे आणि आतल्या बिया काढून,मिरच्या पाण्यात घालून छान उकळवून घेतल्या.
- 2
गार झाल्यावर पाणी काढून टाकले व मिरच्या,लसूण पाकळ्या,आलं,कोथिंबिरीच्या काड्या मिक्सर मधून छान पेस्ट होईल इतपत बारीक वाटून घेतल्या. बाकीचेही साहित्य तयार ठेवले.
- 3
कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात वाटलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले.
- 4
नंतर त्यात मीठ, साखर, टोमॅटो सॉस, सोया सॉस, दालचिनी पूड घालून नीट शिजू दिले.
- 5
कॉर्न फ्लोअर ची पेस्ट करून ती त्यात घालून ढवळून छान शिजवून घेतले. कॉर्न फ्लोअर मुळे सॉस ला कन्सिस्टनसी छान येते. सॉस गार झाल्यावर त्यात व्हिनेगर घालून नीट मिक्स केले.
- 6
तयार सॉस बाउल मध्ये काढून घेतला.नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवला. चायनीज पदार्थ बनवताना त्यात वापरणार.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या