फ्राईड बीट मोमोज (fried beet momos recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#मोमोज आज जरा गम्मतच झाली बघा. सकाळी छान ताज ताजं भाजीच आणलं. मग भाज्या स्वच्छ करून घेतल्या आणि फ्रीज मधल्या टबमध्ये ठेवायला घेतल्यात. तर टबमध्ये चीमलेली काकडी आणि बीट माझ्याकडे बघत होते. नवीन भाजीच आणलं की, जुन्या भाजीची सोय आधी लावावी लागते. वाया जाऊ द्यावसं वाटत नाही. आमच्या घरी बीटचा जेवणामध्ये सलाद म्हणून वापर जरा कमीच असतो. म्हणून बीट आणि काकडीचे किसून मी नेहमी पराठेच करत असते. बीट मुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि आपण स्त्रियांना याची फारच आवश्यकता असते. म्हणून पराठे म्हणा किंवा सलाद म्हणा कोणत्या ना कोणत्या मार्गाने शरीरात बीट गेले पाहिजे.
अरे हो गंमत तर राहिलीच सांगायची! हं तर मग ही चिमलेली काकडी आणि बीट माझ्यावर रागावलेले दिसत होते. म्हणून आधी त्यांना गोंजारून त्यांची सोय लावणे गरजेचे होते. मग तेच आपलं नेहमीप्रमाणे शिलून ,किसून घेतले. किसल्यावर ते दोघेही अगदी ताजे दिसायला लागलेत. आणि मग माझा मूडच चेंज झाला. मला वाटले नेहमी नेहमी काय ते पराठेच पराठे बोर झाले होते खाऊन. म्हणून काहीतरी वेगळं कराव, तर मोमोज करायची कल्पना डोक्यात आली. आणि त्या बिट, काकडीचे मी मोमोज केलेत. नेहमी मोमोज मध्ये भाज्यांचा वापर केला जातो पण मी सलाद चा वापर करून मोमोज केलेत. हल्ली स्टीम करून करत असते पण आज फ्राय करून केलेत. करताना थोडं वाटलं की मी काहीतरी विचित्र तर करत नाहीये ना! पण नाही असं काहीच झालेले नाही,एकदम अफलातून क्रिस्पी झालेत, चवीला सुद्धा मस्त. घरी सगळ्यांना आवडले. आणि माझी फ्राईड बीट मोमोज रेसिपी सार्थकी झाल्याचे मला समाधान मिळाले.😍 चला तर मग बघुयात सलाद पासून मोमोज कसे तयार करायचे ते.........

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2बीट
  2. 1काकडी
  3. 1कांदा
  4. 2टमाटर
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनअद्रक लसण कुटून घेतलेलं
  7. 1 टेबल स्पूनलिंबाचा रस
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1 टेबल स्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 1 कपमैदा
  12. चिमूटभरबेकिंग सोडा
  13. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बीट, काकडी, कांद्याचे साल काढून किसून घ्यावेत. टमाटर सुद्धा किसून घ्यावा अद्रक, लसूण जिरे टाकून खलबत्त्यात कुटून घ्यावं. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    मग या जिन्नसांमध्ये चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घेणे. व हे जिन्नस पाच-दहा मिनिटं झाकून ठेवणे. मग नंतर इकडे एक कप मैदा घेऊन त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा, थोडंसं मीठ घालून मैदा छान मळून घेणे.

  3. 3

    मैदा मळून झाला की त्याला कापडाने पंधरा-वीस मिनिटे झाकून ठेवणे. मग एकजीव केलेल्या मिश्रणाला हाताने दाबून त्यातले पाणी काढून घेणे. हे पाणी आपण पिऊ शकतो पोष्टिक असत फेकायचं नाही.

  4. 4

    नंतर एका पॅन मध्ये एक टेबलस्पून तेल टाकावे व त्या तेलामध्ये हे सारण टाकून त्यामध्ये तिखट, सोया सॉस, मीठ लिंबाचा रस घालून ते सारण कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे. आणि झाल्यानंतर थंड करायला ठेवावे.

  5. 5

    आता मैदा परत एकदा चांगला मळून घ्यावा व त्याचे गोळे करून लाटून घ्यावेत. आपल्याला वाटीने शेप द्यायचा असेल तर तसं करू शकतो किंवा छोटे छोटे गोळे करून एक एक पुरीसारखे सुद्धा आपण करू शकतो.

  6. 6

    पुरी सारखं तयार झाल्यावर त्यांच्या काठाने बोटाने गोलाकार पाणी लावून घ्याव. व त्यामध्ये हे सारण भरावं. आपल्याला हवे त्या आकाराचे मोमोज तयार करावेत.

  7. 7

    मोमोज तयार झाल्यावर एका कढईत तेल टाकून तेल गरम झाल्यावर ते छान गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्यावेत.

  8. 8

    मोमोज छान तळून झाल्यावर सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावेत आणि शेजवान चटणी, मोमोज सॉस सॉस,टोमॅटो सॉस,रेड चिली सॉस आपल्याला आवडेल त्याच्यासोबत मोमोजचा आस्वाद घ्यावा. मग काय करणार ना घरी.करा आणि सांगा मला कसे लागतात ते........🙏😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes