दुधीची कोफ्ता करी (dhudhi bhopala kofta curry recipe in

#कोफ्ता एरवी दुधीची भाजी अजिबात खात नाहित असे लोकही कोफ्ता करी फस्त करतात.हा अनुभव आहे. एकदा तुम्ही दुधी चीकोफ्ता करी खाल्ली ना तर दुधी भाजी ला नावं ठेवणार नाहीत

कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या.प्रथम दुधी सोलून घ्या, नंतर त्याला किसनीने किसुन घ्या. त्याला पाणी सुटले असेल ते सगळे पिळुन काढुन घ्या.कांदा टोमॅटो ची मिक्सर ला प्युरी करून घ्या.
- 2
किसलेल्या दुधी मध्ये बेसन,बारीक चिरलेला कांदा,कॉर्नफ्लोर, कसूरी मेथी, जीरे, ओवा,लसूण मिरची पेस्ट, थोडे तिखट,हळद मीठ, कोथींबिर चिरुन घालवी.सर्व चांगले एकत्र करावे,पाणी अजिबात वापरु नये.मिश्रणाचे छोटे गोळे करावेत.
- 3
गॅसवर एका कढईत कोफ्ते तळण्यासाठी तेल गरम करावे व त्यात वरील गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळावेत.
- 4
कढईत तेल तापवून त्यात धणे, चक्रीफुल, तमालपत्र ची फोडणी करावी.कांदा टोमॅटो ची प्युरी परतून घ्यावी. काजूची पेस्ट घालावी.तेल सुटू लागले की त्यात लाल तिखट,हळद, गरम मसाला,बारीक वाटलेला नारळ, मीठ, घालावे.
- 5
पाणी घालून एक उकळी आणावी.चवीपुरते मीठ घालून करीमध्ये कोफ्ते सोडावेत व आणखी एक उकळी आणावी. वरून कोथिंबीर व कडीपत्ता पाने पेरावीत.
- 6
भाकरी सोबत गरमागरम सर्व्ह करावी. चवीला एकदम अप्रतिम लागते. नुसतीही खाऊ शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)