स्वीट पॅकेट (sweet packet recipe in marathi)

#रेसिपीबुक
#Week8
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त हे स्वीट पॅकेट मी तयार केलेले आहे,,
नेहमी नेहमी तीच ती पुरणाची पोळी खाऊन कंटाळा येतो,,
म्हणून जरा वेगळे करावे म्हणून हा प्रयत्न मी केला,
आपली कडे श्रावण महिन्याला अधिक महत्व आहे, खुप पवित्र वातावरणात पूर्ण महिना पार पडतो,
आणि त्यात नारळी पौर्णिमा ला जास्त महत्त्व आहे,,
आणि तसे हे सर्व सण उत्साह आणि नात्यात मधला गोडवा घेऊन येतात,
कारण आपल्याकडे सन म्हंटले की कुटुंब एकत्र येतात,
आणि सर्व रूसवे पुसवे बाजूला करून आपण सण एकत्र येऊन प्रेमाने, श्रद्धेने साजरे करतो,
चला तर मग अगळा वेगळा प्रकार करूया,,

कुकिंग सूचना
- 1
पुरण करण्यासाठी चना डाळ चांगली एकजीव शिजवून घेणे, त्याला स्मॅश करुन करून घ्यावे, चांगले एकजीव करून घ्यावे
- 2
ड्रायफ्रूट्स चे पावडर करून घेणे, चना डाळ चांगल एकजीव करुन घेतली की त्यामध्ये गूळ घालून त्याला चांगले शिजवून घेणे, त्यात वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स पावडर आणि जायफळ पावडर घालून मिक्स करावे, या मिश्रणाला थंड होऊ द्यावे..
- 3
पॉकेट तयार गव्हाच्या पिठामध्ये तेल मीठ घालून चांगले मिक्स करून घ्याव..
- 4
आता त्यामध्ये पाणी घालून त्याला चांगलं मळून घ्यावे, त्याचा गोळा तयार करून त्याला झाकून ठेवणे, आणि अर्ध्या घंट्या साठी रेस्ट करण्यास ठेवणे,
- 5
आता त्याची पोळी लाटून घेणे, त्याला चौकोनी आकारांमध्ये कापून घेणे अशा सर्व गोळ्यांच्या शिट तयार करून घेणे, एका शीट मधे पुरणाची छोटी गोळी तयार करून ती भरून त्याचा पॅकेट तयार करून घेणे, फोक च्या साह्याने त्याच्या कडा बंद करून घ्याव्यात,,
- 6
असा सर्व सीट्स चे पॅकेट तयार करून घेणे, आणि तूपा मध्ये डीप फ्राय करून घ्यावेत, इथे टाळण्यासाठी तुम्ही तेल वापरू शकता, पण हे पॅकेट्स तुपात तळलेले चवीला अतिशय सुंदर लागतात,,
- 7
चांगले खरपूस तळून घ्यावेत, सर्व पॅकेट तळून झाले की त्यावर पिठी साखर घालून गारनिष करावे, तयार आहे नवीन प्रकारचे स्वीट,, ट्रॅडिशनल ला मॉडन टच,,
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)