ओल्या नारळाची कचोरी (olya naralachi kachori recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#रेसिपीबुक
#week8
#नारळीपौणिमा
#post2
सण, उत्सव व व्रते याच्या मागचे शास्त्र लक्षात घेऊन, श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रताच्या दिवशी तरी तो पाळला जावा.. म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रताचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणाऱ्या सण, धार्मिक उत्सव व व्रतामध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.
राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून, ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे, पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्याने भावनांचा ओलावा मिळतो.
मग हाच ओलावा कायम ठेवण्यासाठी, भावाच्या आवडीचे बनवून त्याला खाऊ घालने, यात काही वेगळाच आनंद असतो....... माझ्या भावाला गोड फारस आवडत नाही. तिखट चटपटीत काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मग त्याच्यासाठी त्याला आवडणारी *ओल्या नारळाची कचोरी* मी केली. खूप यम्मी आणि टेस्टी झाली ही कचोरी. लो फ्लेम वरती तळायची म्हणजे कचोरी चांगली क्रिस्पी होते. ही कचोरी तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये भरून एक आठवडा ठेवू शकता.
करायची मग, *ओल्या नारळाची कचोरी*... 💃🏻💃🏻

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. पारीसाठी साहित्य..
  2. 250 ग्राममैदा किंवा कणिक (मी येथे अर्धी कणिक व अर्धा मैदा वापरला आहे)
  3. २/३ टेबलस्पून तेल
  4. चवीनुसारमीठ
  5. फिलिंग साठी साहित्य..
  6. 25 ग्रॅममुगाची डाळ
  7. 2 ते 3 चमचे बेसन
  8. 50 ग्रॅमओल्या नारळाचा कीस ६/७हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  9. 1 टेबलस्पूनतिखट
  10. 1 टेबल स्पूनधने पावडर
  11. 1 टेबलस्पूनजिरे पावडर
  12. 1 टीस्पूनहिंग
  13. 1 टेबलस्पूनअद्रक पेस्ट
  14. 1 टेबलस्पूनभाजलेली सोफ
  15. 1 टेबलस्पूनजिरे
  16. 1 टेबल स्पूनमोहरी
  17. 1 टेबल स्पूनआमचूर पावडर
  18. 1 टेबलस्पूनसाखर तळण्यासाठी तेल
  19. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    एका परातीत मैदा व कणिक घ्या. व त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल,(मोहनासाठी तेल जास्त घालू नका. जास्त तेल झाले तर आपली कचोरी तेलकट होते) मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्या.
    पंधरा मिनिटं बाजूला झाकून ठेवून द्या. हा झाला आपला पारीसाठी डो तयार

  2. 2

    भिजवलेली मुगाची डाळ चाळणीत काढून ठेवा. नंतर कपड्या वरती पसरून बिल्कुल कोरडी करून घ्या व मिक्सर च्या भांड्यातून खडबडीत बारीक करून घ्या.

  3. 3

    आता एक पॅन घ्या. त्यामध्ये तेल घाला. तेल चांगले गरम झाले की, मोहरी, जिरे, भाजलेली सोफ व हिंग घालून थोडे परतून घ्या.नंतर अद्रक पेस्ट, हिरव्या मिरच्या व तिखट, हळद, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, घालून एक मिनिट चांगले परतून घ्या.

  4. 4

    यानंतर यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस व खडबडीत वाटलेली मुगाची डाळ घाला. दोन मिनिटे व्यवस्थित परतून घ्या व गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून द्या. हे आपले सारण तयार

  5. 5

    भिजवलेल्या डो ला परत एकदा मळून घ्या. व त्याचे समान भागात लिंबाएवढे गोळे करून घ्या. पोळपाटावर एक गोळा ठेवून पूरी एवढी पारी लाटून घ्या. व त्यामध्ये हे तयार केलेले केलेले सारण भरून घ्या. गोल गोल फिरून वरती आलेला एक्स्ट्रा चा गोळा काढून घ्या व त्याला हाताने प्रेस करा. नंतर पोळपाटावर हलक्या हाताने थोडशी लाटून घ्या. अशाच प्रकारे बाकीच्या कचोर्‍या तयार करून घ्या.

  6. 6

    कढई मध्ये तेल घाला. तेल जास्त गरम करु नका. यामध्ये आता तयार केलेल्या कचोर्‍या अगदी लो फ्लेम वरती तळून घ्या. आपल्याला कचोरी तळायला १० ते १२ मिनिटे लागतात. तळताना गॅस ची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. अश्या प्रकारे कचोरी जेव्हा आपण तळतो तेव्हा ती छान क्रिस्पी तळल्या जाते. राहिलेल्या सर्व कचोर्‍या अशाच प्रकारे तळून घ्या.

  7. 7

    हि झाली आपली *ओल्या नारळाची कचोरी* तयार.. तळलेली मिरची व गरमा गरम चहा सोबत सर्व्ह करा ओल्या नारळाची कचोरी..... 💕💃

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes