बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 12
# बाकरवडी
कुकिंग सूचना
- 1
मैदा, पीठ, मीठ, तूप, ओवा आणि थोडं पाणी टाकून गोळा म्हणून 20 मिनिटांसाठी झाकून ठेवावा. त्यानंतर बाकीचे सर्व साहित्य घेऊन ते हाताने चांगले एकत्र करावे तीळ, खसखस, खोबरे थोडसं मंद आचेवर भाजून घ्यावे. नंतर शेव किंवा पापडीची पावडर करावी. असे सर्व साहित्य सर्व मसाले घालून मीठ घालून एकत्र करून घ्या.
- 2
वरील पिठाची पोळी लाटून त्यावर थोडी चिंचेची चिंचगुळाची चटणी लावून त्यावर तयार मसाला पसरवून घ्यावा. त्याचा दाबून दाबून रोल करावा व त्या रोलचे एक समान भाग करावे.
- 3
नंतर तयार वड्या तेलावर डीप फ्राय करून घ्यावेत. तयार आहे कुरकुरीत अशी बाकरवडी....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13534057












टिप्पण्या