बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12
आजची बाकरवडी मी खास माझ्या नवऱ्यासाठी बनविले आहे . यात मी बेसन पीठाचा वापर केलेला नाही, मी यात तूर दाळ आणि मसुर दाळ पीठाचा वापर केलेला आहे,
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12
आजची बाकरवडी मी खास माझ्या नवऱ्यासाठी बनविले आहे . यात मी बेसन पीठाचा वापर केलेला नाही, मी यात तूर दाळ आणि मसुर दाळ पीठाचा वापर केलेला आहे,
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आवरणासाठी सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ मळून घ्यावे.
- 2
सुके खोबरे किसून थोडे भाजून घ्यावे. तसेच धने तीळ खसखस भाजून घ्यावे.१ टीस्पून धने बाजुला काढून ठेवावे.नंतर तूर मसुर पीठ कोरडेच भाजून घेणे.
- 3
खोबरे मिक्सरमधून काढून घेणे तसेच भाजून घेतलेले मसाले मिक्सरमधून काढून घेणे. सारण एकत्र करून घेऊन त्यात तिखट हळद गरम मसाला २/३ टीस्पून चिँचेची चटणी सर्व एकत्र करून घेणे लसणाचे बारिक तुकडे हिरवी मिरच्यांचे तुकडे कोथिंबीर तळून घेणे. सर्व सारण एकत्र करून ठेवावे.
- 4
सारण थंड होण्यासाठी ठेवून देणे. चिँचेची चटणी अगोदरच तयार करून घ्यावी चिँच कोळून त्यात काळ मीठ जीरे पावडर तिखट मीठ गूळ टाकून सर्व चांगले उकळून घ्यावे.
- 5
पीठाचा एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी. त्याला फोटोत दाखविल्याप्रमाणे चौकोनी आकार देणे. त्यावर चिँचेची चटणी लावून घेणे. नंतर सारण पसरविने, आवरणाची गुंडाळी करताना चित्रात दाखविल्याप्रमाणे मैद्याचा घोळ बोटाने प्रत्येक वेळेस लावणे.
- 6
वड्या सारख्या आकाराच्या कापून गरम तेलात तळून घेणे. गरमा गरम बाकरवडी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या