बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#रेसिपीबुक #week12
#बाकरवडी

काही पदार्थ ना, चोरून खाण्यात जो आनंद मिळतो तो असा सरसकट ,एखादा पदार्थ समोर असतांना खाण्यात अजिबात येत नाही. पुर्वी नाही का आपण ,आईने बनविलेला लाडू, चकल्या अगदी तिच्या नकळत फस्त करायचो अगदी तसंच. फक्त आता त्या पदार्थांची जागा आत्ताच्या फास्टफूड पदार्थाने घेतली इतकंच. हल्लीच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी बदलल्या म्हणूनच तर पाणी पुरी, दही पुरी, पिझ्झा, बर्गर असे एक ना अनेक प्रकार, त्यातल्या त्यात गुजरात वरून आलेली ही बाकरवडी हे सगळेच पदार्थ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. बाकरवडी ही जरी गुजरात वरून आलेली असली तरी तिच्या अप्रतिम चवीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचली..आणि "ती"केवळ पोहोचलीच नाही तर, अगदी बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रूचली आणि पचली सुद्धा. म्हणून तर अती खाऊ नको म्हटलं की, चोरून खाण्यातही ह्यांना आनंद वाटु लागलाय. काय मग बाकरवडी चोरताय ना! सॉरी ,सॉरी सॉरी आपलं खाताय ना! खायलाच पाहिजे आणि त्यासाठी बाकरवडी घरी बनवायलाच पाहिजे. चला तर मग..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग
  1. पारी करिता साहित्य
  2. 200 ग्रॅममैदा
  3. 100 ग्रॅमबेसन
  4. चिमुटभर मीठ
  5. 2 टेबलस्पून तेलाचे कडकडीत मोहन
  6. सारणा करिता साहित्य
  7. 25 ग्रॅमधने
  8. 25 ग्रॅमजिरे
  9. 25 ग्रॅमबडीशेप
  10. 25 ग्रॅमसुक्या खोबर्‍याचा किस
  11. 25 ग्रॅमतीळ
  12. 1/4 वाटीकोथिंबीर
  13. 3 टेबलस्पून बारीक शेव
  14. चिंच गुळाची चटणी
  15. 2 टेबलस्पून लाल तिखट
  16. 2 टेबलस्पून पिठीसाखर
  17. चवीपुरतं मीठ
  18. तळण्याकरता तेल

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात मैदा आणि बेसन चाळणीने चाळून घ्या. आता त्यात तेलाचे मोहन व मीठ घाला. आता सगळं तेल, बेसन आणि मैद्याला लागेल इतपत मिक्स करा. आता त्यात थोडे पाणी घालून त्याचा घट्टसर गोळा तयार करा.तयार गोळा पंधरा मिनिटां करिता तसेच झाकून ठेवून द्या.

  2. 2

    आता एका पॅनमध्ये जिरे, धणे,तीळ, बडीशेप, खोबऱ्याचा कीस,कोथिंबीर क्रमाक्रमाने भाजून नंतर सर्व एकत्र करून घ्या. आता मिक्सरमध्ये त्याची पावडर तयार करा.

  3. 3

    तयार पावडर मध्ये तिखट, मीठ, पिठीसाखर घाला व परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. हा आपल्या बाकरवडी चा मसाला तयार होईल.

  4. 4

    आता तयार गोळ्या पैकी एक छोटा गोळा घेउन त्याची पातळ पोळी लाटून घ्या. तयार पारीवर सर्वप्रथम चिंचगुळाची चटणी नंतर बाकरवडी मसाला व शेवटी बारीक शेव पसरवून घ्या (फोटोत दाखविल्याप्रमाणे.) आता त्यावर परत लाटणे फिरवून घ्या. असे केल्याने मसाला छान चिकटून बसेल.

  5. 5

    आता त्या पारीचा घट्ट रोल तयार करा. तयार रोलचे एक इंच आकाराएवढे तुकडे करा.आता त्या तुकड्यांना हाताने हलकेच दाबून घ्या. या आपल्या बाकरवड्या तयार झाल्या. अशा प्रकारे सगळ्या बाकर वड्या तयार करून घ्या. तयार बाकरवड्या गरम गरम तेलातून तळून घ्या.

  6. 6

    या आपल्या बाकरवड्या तयार झाल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Mate
Seema Mate @cook_22805348
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes