बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#रेसिपीबुक #week12
# बाकरवडी
महाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12
# बाकरवडी
महाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२-४ व्यक्ति साठ
  1. १०० ग्रॅम मैदा
  2. 2टेबलस्पुन बेसनपिठ
  3. 1/4टिस्पुन ओवा
  4. 2टेबलस्पुन गरम तेल
  5. सारणाचे साहित्य
  6. २ टेबलस्पुन तिळ
  7. १०० ग्रॅम किसलेले खोबरे किंवा डेसिकेटेड कोकनट
  8. 2टिस्पुन साखर
  9. 2टिस्पुन धणे
  10. 2टिस्पुन खसखस
  11. 1टिस्पुन बडिशोप
  12. 1टिस्पुन जिरे
  13. 1टिस्पुन गरम मसाला
  14. 1टिस्पुन टिस्पुन तिखट
  15. २० ग्रॅम बारीक शेव
  16. 2-3टेबलस्पु चिंचेची घट्ट चटणी
  17. चविनुसार मिठ
  18. ३०० ग्रॅम तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    बाऊलमध्ये मैदा बेसनपिठ ओवा थोडा हातावर चोळुन टाका(स्वाद येण्यासाठी) त्यातच मिठ व गरम तेल टाका व पाण्याने घट्ट गोळा मळुन १/२ तास झाकुन ठेवा.

  2. 2

    कढईत तिळ बडिशोप धणे जिरे थोडे परतुन काढुन ठेवा नंतर सुके किसलेले खोबरे खसखस व अर्धी शेव परतुन काढुन ठेवा.

  3. 3

    वरील वस्तू थंड करून मिक्सर जारमधुन पावडर करून घ्या त्यात च पावडर मसाले व थोडे मिठ टाकुन बारीक करा.

  4. 4

    तयार झालेल सारण बाऊल मध्ये काढुन थंड करा.

  5. 5

    मळलेल्या पिठाचा ऐक गोळा पोळी सारखा लाटुन घ्या त्यावर चिंचेची चटणी पसरवा नंतर तयार केलेले सारण पसरवा.

  6. 6

    पसरवलेल्या सारणावर थोड़ी शेव पसरवुन लाटण्याने थोडे फिरवुन सारण दाबुन घ्या व पोळी घट्ट गुंडाळुन घ्या व सुरीने त्याचे तुकडे पाडुन घ्या.

  7. 7

    व हाताने हलकेच प्रेस करा व ताटात काढुन१/२ तास ठेवुन नंतर गरम तेलात स्लो गॅसवर तळा.

  8. 8

    त्याचप्रमाणे मिनी बाकरवड्या ही करून घ्या.

  9. 9

    अशा प्रकारे लहान मोठ्या आकारात बाकरवडया बनवुन घ्या.

  10. 10

    सर्व बाकरवड्या गोल्डन कलरवर तळुन काढा.

  11. 11

    व डिश मध्ये किंवा बाऊल मध्ये सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes