आळुवडी (aluvadi recipe in marathi)

Shilpa Limbkar @cook_20269433
#रेसिपीबुक #आळुवडी
आळु वडी हा पश्चिम महाराष्ट्रातला पारंपारिक खाद्यपदार्थ आहे.
आळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #आळुवडी
आळु वडी हा पश्चिम महाराष्ट्रातला पारंपारिक खाद्यपदार्थ आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून कोरडी करावी.
- 2
आता एका पातेल्यात बेसन घ्यावे त्यात लाल तिखट मीठ हळद आले लसूण पेस्ट व लिंबू पिळून घ्यावा. व जास्त घट्ट ही नाही व जास्त पातळही नाही असे सारण तयार करावे.
- 3
व व एका पानावर सारण भरून दुसरे पान त्यावर उलट्या दिशेने लावावे. अशा रीतीने पान एकमेकांवर रचून त्यात सारण भरूनत्यांची घट्ट वळकटी घालावी.
- 4
वळकटी केलेले अळूवडी चे पान कुकरला दहा मिनिटे वाफवून घ्यावी व थंड झाल्यावर त्याच्या गोल चकत्या कराव्यात.
- 5
तयार आळूवडी ला मंद आचेवर खरपुस तळुन घ्यावे अथवा शालो फ्राय करून गरमागरम चटणी अथवा सॉसबरोबर खाण्यास द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13676907











टिप्पण्या