भगर कोरियंडर शाही सूप (bhagar coriander shahi soup recipe in marathi)

#fr #उपवास म्हंटले की पचनास हलके फुलके खाल्ले जाते. असे म्हणतात की एक दिवस पोटाला आराम अर्थात आपण त्या दिवशीही म्हणजेच उपवासाच्या दिवशी ही वेगवेगळे चविष्ट पदार्थ करून खातोच. भगर कोरिअंडर शाही सूप हा सूप चा किंवा उपवासाच्या सूपचा असा प्रकार आहे की तो लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडु शकतो तसेच पचनास हलका व चविष्ट आहे. तसेच डायट फोलो करणाऱ्यांसाठी ही झटपट तयार होणारा व पौष्टिक दमदार पदार्थ आहे आहे. काही वेळेस घरात फक्त गृहिणींचे उपास असतात अशा वेळेस त्या फक्त चहा घेऊन उपवास करतात. अशावेळेस ऍसिडिटी होते त्यासाठी हा पदार्थ झटपट तर बनवला जाऊ शकतो शिवाय शरीरात पुरेशी एनर्जी पण निर्माण करतो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा भिजवून घ्यावा. आता कोथिंबीर व हिरव्या मिरचीची बारीक पेस्ट तयार करावी.
- 2
आता कढईमध्ये तूप गरम करत ठेवावे. तूप तापल्यावर जीरे याची फोडणी करावी. व त्यात सर्व पीठे जसे की साबुदाणा, भगर, राजगिरा, केळीचे, शिंगाड्याचे म्हणजेच भाजणीचे पीठ खरपूस भाजून घ्यावे.
- 3
भाजणी चे सर्व पीठ भाजून झाल्यानंतर त्यात आपण बनवलेली कोथंबीर व मिरचीची पेस्ट घालावी. व लागता लागता पाणी घालावे.
- 4
सूप ला उकळी आल्यावर त्यात रताळ्याचे काप व साबुदाणा घालावा.व साबुदाणा शिजेपर्यंत उकळू द्यावे व आपल्याला हव्या त्या प्रमाणात घट्ट बनवून घ्यावे.
- 5
तयार आहे भगर कोरियंडर शाही सुप
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)