कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)

#md
आईच्या हातचा असं तर प्रत्येक पदार्थ आवडतो मला मग तो वरण भात असून दे किंवा अगदी श्रीखंड. अशीच आईच्या हातची मला कांदा बटाटा भजीही मला खूप आवडतात. पहिला पाउस पडला की माझी कायम फार्मइश असायची भजी कर. आज मदर्स डे निमित्त ती आठवण काढत मी ही भजी केलीत.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे सोलून गोल काप करुन घेणे. कांदा उभा चिरुन घेणे. कांद्यात मीठ, हळद व लाल तिखट व ओवा घालून मिक्स करुन ठेवणे. एका भांड्यात बेसन घेउन त्यात लाल तिखट, हळद, मीठ व ओवा घालून भज्यांच पीठ भिजवून ठेवणे.
- 2
मग तेल गरम करायला ठेवणे, तेल कडकडीत गरम गरम झाले की, बेसनात बटाटे घोळवून तेलात गरम भजी तळून काढणे. कांद्याला पाणी सुटल की त्यात बेसन घालून कांद्याच्या भजीच पीठ भिजवाव, पाणी जास्त घालू नये.कांद्याच्या सुटलेल्या पाण्यात शक्यतो भिजवावे. मग गरम तेलात भजी तळून काढावीत. गरम गरम भजी सर्व करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कोल्हापूरी गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
- कोल्हापुरी झणझणीत चिकन ताट (chicken taat recipe in marathi)
- तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
- "पारंपरिक सुरळीच्या वड्या" (Suraḷichya vadya recipe in marathi)
- चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

टिप्पण्या