चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#pcr
ना तिखा ना मखनी, दिल बोले बिर्याणी..!

चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)

#pcr
ना तिखा ना मखनी, दिल बोले बिर्याणी..!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४-५ सर्व्हस
  1. 1/2 किलोचिकन
  2. 1/2 किलोबासमती तांदूळ
  3. 4-5लवंग
  4. 4-5मिरे
  5. 2तेजपान
  6. 1कर्णफूल
  7. १- इंच लांबीचे
  8. २- तुकडे दालचिनीचे
  9. 6-7हिरव्या मिरच्या
  10. 1 चमचाधने पावडर
  11. 1 चमचाजीरे पावडर
  12. 1/2 वाटीदही
  13. 1/2 वाटीतेल
  14. 1 चमचातूप
  15. 1 चमचाहळद
  16. १.५ चमचा लाल तिखट
  17. 1/2 चमचागरम मसाला
  18. 2 चमचेबिर्याणी मसाला
  19. 2 चमचेमीठ किंवा आपल्या चवीनुसार
  20. 1जुडी पुदिना
  21. 1जुडी कोथिंबीर
  22. 2मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घ्यावे
  23. 2मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून तळून घ्यावे

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    मँरिनेट करण्यासाठी चिकन, धने पावडर, जीरे पावडर, हळद, तिखट, काळा मसाला, बिर्याणी मसाला, मीठ, ३ हिरव्या मिरच्या, दही, २-३ चमचे तेल,अर्धा जुडी पुदिना बारीक चिरलेला, अर्धा जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून सर्व साहित्य एकजीव करून अर्धा तास झाकून ठेवावे

  2. 2

    गॅस वर कुकर ठेवून त्यात ३-४ चमचे तेल टाकून त्यात मिरे,लवंग, ३-४ हिरव्या मिरच्या, तेजपान,दालचिनी टाकून गॅस बारीक करून त्यात मँरिनेट केलेल चिकन टाकावे. गँस फूल असेल तर चिकन मधे दही असतं ते फुटून जाईल म्हणून गँस बारीक करावा.

  3. 3

    तेलामध्ये मँरिनेट केलेल चिकन टाकून झाल्यावर त्याला हलवून घेऊन, ७-८ मिनिटे झाकून ठेवावे.

  4. 4

    मधून मधून मिश्रण हलवावे कारण खाली लागेल म्हणून.

  5. 5

    ७-८ मिनिटे चिकन वाफे पर्यंत तांदूळ धुवून घ्या. तांदूळ धुवून फक्त १५ मिनिटेच ठेवावे नाही तर तुकडा पडतो.

  6. 6

    चिकन वाफून झाल्यावर त्यात अर्धा किलो तांदळाच्या हिशोबाने अंदाजे २ ग्लास पाणी घालून त्यात अर्धे तांदूळ टाकून त्यावर थोडे कोथिंबीर व थोडे पुदीना आणि तळून घेतलेला कांदा टाकून परत त्यावर राहिलेले तांदूळ कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा टाकूवा (अशा २ थर लावाव्या).

  7. 7

    नंतर त्यात थोडा केशरी कलर २ चमचे पाण्यात घोळून टाकावे

  8. 8

    कुकरची १ शिट्टी आणि १ वाफेवर गॅस बंद करावा. आणि १५ मीनिटांनी कुकरचे झाकण उघडावे.

  9. 9

    अशी आपली चिकन बिर्याणी तयार. 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes