कोल्हापूरी गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS2

कोल्हापूर खाद्यजीवनाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मांसाहार. इथल्या आहारात वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते.
इथली गंमत म्हणजे, तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचं. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो.
आज मी अशीच कोल्हापूरी गावरान चिकन बनवून पाहिले ,लय भारी झाले बघा!!😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते ५ सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोचिकन स्वच्छ केलेले धुऊन
  2. 1.5 वाटीसुके खोबरे
  3. 3मोठे कांदे
  4. 10-12 लसूण पाकळ्या
  5. आलं
  6. कोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1/4 कपधणे
  11. 1/4 कपजीरे
  12. 6लवंगा
  13. 10काळिमिरी
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    चिकनला हळद,मीठ लावून कढईत चिकन आणि पाणी घालून शिजायला ठेऊन द्या..

  2. 2

    गॅसवर कांदे,खोबरे काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्या.

  3. 3

    पॅनमधे धणे,काळिमिरी,लवंगा,जीरे छान खमंग भाजून घ्या. मिक्सरला इ मांड्या भाजलेले कांदे,खोबरे चिरून घाला व त्यात लसूण,आलं कोथिंबीर,भाजलेला मसाला आणि थोडं पाणी घालून बारीक वाटणे वाटून घ्या.

  4. 4

    कढईत थोडं जास्त तेल गरम करून त्यात लाल तिखट,कांदा लसूण मसाला, टोमॅटो एकत्र छान परतून घ्या. टोमॅटो मुळे मसाला जळणार नाही. नंतर त्यात वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे.

  5. 5

    नंतर त्यात शिजवलेले चिकन,मीठ थोडं बेतानेच घालावे आणि चिकन मधील पाणी घालून छान एकत्र करून शिजू द्या. चिकन आधी शिजल्यामुळे फार वेळ लागणार नाही.

  6. 6

    आपलं अस्सल कोल्हापुरी गावरान चिकन मसाला तयार!!
    वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes