रेड व्हेलव्हेट केक (Red velvet cake recipe in marathi)

रेड व्हेलव्हेट केक (Red velvet cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात बटर व पीठी साखर घालून एकत्र करावे. हलके होइ स्तोवर फेटून घ्यावे.त्यात साधं ताक घालावे व एकत्र करावे. नंतर त्याच भांड्यात चाळणी ठेवून त्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर घालावे.
- 2
तोपर्यंत कढईप्रीहीट करून घ्यावी 7-8 मिनिटे मध्यम आचेवर.
- 3
मिश्रण एकत्र करुन घ्यावे व त्यात व्हॅनीला इसेंस, रेड जेल कलर व व्हीनेगर घालून नीट मिक्स करावे.बेकिंग टीन ला बटर ने ग्रीस करून घ्यावे. मिश्रण बेकिंग टीन मध्ये घालून 40-45 मिनिटे बेक करून घ्यावे.
- 4
व्हिपींग क्रीम व्हीप करून घ्यावे. व्हीप करण्यासाठी क्रीम गार असावे.electric beater ने आधी 5 मिनिटे लो स्पीड वर बीट करावे व नंतर साॅफ्ट पीक येई पर्यंत हाय स्पीड वर बीट करावे. रेड जेल कलर घालून मिक्स करावे व फ्रिज मध्ये ठेवावे.
- 5
एका bowl मध्ये क्रीम चीज व व्हीप्ड क्रीम एकत्र करुन घ्यावे.
- 6
केक गार झाल्यावर डीमोल्ड करून घ्यावा. सुरी ने केक चे तीन लेयर कट करून घ्यावे. एक लेयर घेऊन त्यावर क्रीम चीज व व्हीप्ड क्रीम चं मिश्रण पसरवून घ्यावे. त्या पध्दतीने तीन ही लेयर ठेवून व्हीप्ड क्रीम ने कव्हर करून घ्यावा.पायपींग बॅग मध्ये व्हीप्ड क्रीम भरून आपल्या आवडीनुसार सजावट करावी व गार करून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes





टिप्पण्या