झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#बिर्याणी
मी उज्वला रांगणेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई बिर्याणी मस्त झाली.

झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#बिर्याणी
मी उज्वला रांगणेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई बिर्याणी मस्त झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1 मेजरींग कप बासमती तांदूळ
  2. 1कांदा
  3. 2 टेबलस्पूनगाजर
  4. 2 टेबलस्पूनस्वीट कॉर्न
  5. 2 टेबलस्पूनमटार
  6. 1सिमला मिरची
  7. 2 टेबलस्पूनफरसबी
  8. 1टोमॅटो
  9. 7-8लसूण पाकळ्या
  10. 1 इंचआलं
  11. 2हिरव्या मिरच्या
  12. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  13. 1 टिस्पून तिखट
  14. 1 टिस्पून बिर्याणी मसाला
  15. 2 टिस्पून खडा मसाला
  16. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  17. 1 टिस्पून जीरे
  18. 1/2 टिस्पून हळद
  19. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास ठेवून दिले. सर्व भाज्या चिरून घेतल्या. व मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये सर्व भाज्या वाफवून घेतल्या. टोमॅटो, आलं लसूण मिरची ह्यांचे वाटण करून घेतले.

  2. 2

    आता कढईमध्ये तूप गरम करून त्यात जीरे, खडा मसाला, कांदा घालून परतून घेतले. वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतली नंतर त्यात तिखट बिर्याणी मसाला मीठ मिक्स केले व बासमती तांदूळ घालून परतले.

  3. 3

    तांदूळ परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालून दोन-तीन मिनिट शिजवून घेतले व मग वाफवलेल्या भाज्या घालून सर्व चांगल्या शिजेपर्यंत वाफ आणली.

  4. 4

    आता तयार व्हेज बिर्याणी डिश मध्ये काढून वरून कोथिंबीरीने गार्निश करून रायत्या बरोबर सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes