रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
7 सर्व्हिंग्ज
  1. केकसाठी साहित्य
  2. 100 ग्रॅम मैदा
  3. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 1 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/4 टेबलस्पूनबेकिंग सोडा
  6. 50 ग्रॅमबटर
  7. 130 ग्रॅमकंडेन्स मिल्क
  8. 1 टेबलस्पूनव्हॅनिला इसेन्स
  9. 50 एम. एल दूध
  10. 1/2 चमचाजेल रेड फूड कलर
  11. 1/4 कपकेक फ्रॉस्टींग साठी क्रीम चिज
  12. 3 टेबलस्पूनपिठी साखर
  13. 1 टेबलस्पूनव्हॅनिला इसेन्स
  14. 1 कपव्हीप क्रीम
  15. 100 एम. एलशुगर सिरप
  16. 1 चमचाशुगर बॉल
  17. बटर पेपर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,मग मैदा-बेकिंग सोडा-बेकिंग पावडर-कोको पावडर एकत्र घेऊन चाळून घ्या, तसेच एक बोलमध्ये कंडेन्स मिल्क-बटर-एस्सेन्स -अर्धा दूध घेवुन ते फेटून घ्या,मग त्यात चाळून घेतलेल्या सर्वं गोष्टी घालून बिटर च्या साहाय्याने एक दिशेने फेटून घ्या त्याचवेळी राहिलेलं अर्धं दूध व फूड कलर घाला

  2. 2

    एक कढई किंवा मोठं भांडे गॅसवर 10 मिनिटे प्री हिट करायला ठेवा,त्यात एक स्टँड किंवा एक प्लेट उलटी करून ठेवा,केक टिन ला आतून बटर लावून ग्रिसिग करून घ्या व बटर पेपर लावून पुन्हा ग्रिसिग करून घ्या,मग आपण तयार केलेलं केकचे पीठ केक टिन मध्ये ओतून केक टिन कढई मध्ये ठेवून द्या व वरून झाकण लावून केक 30-35 मिनिटे बेक करून घ्या

  3. 3

    बेक झालेवर केक खाली दाखवले प्रमाणे दिसेल,केक फ्रॉस्टींग साठी वरचं लिहिलेलं सर्व साहित्य एकत्र एक बोलमध्ये घेउन बिटर च्या सहाय्याने बिट करून घ्या,मग केक चे तुम्हाला जितके हवे तितके लेयर कापून घ्या,बोर्डवर केक लेयर ठेवून त्यावर शुगर सिरप चमच्याने पसरवून घ्या मग फ्रॉस्टींग क्रीम पसरवून घ्या,मग पुन्हा दुसरा लेयर अश्याच प्रकारे लावून घ्या

  4. 4

    मग शेवटी मध्ये हार्ट चा शेप शिल्लक ठेवून बाकी ठिकाणी क्रिम स्प्रेड करून घ्या,व मधल्या हार्ट शेपला व केकच्या कडांना बेक केलेल्या केकचा चुरा लावून घ्या व सजावटीसाठी सिल्व्हर शुगर बॉल टाका मग तयार झाला आपला रेड वेलवेट केक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes