कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व कैर्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. ह्या क्रिया चांगल्या कोरड्या फडक्याने पुसून घ्या. आता ह्या कैरीचे चौकोनी मध्यम बारीक आकाराचे तुकडे करा.
- 2
आता हिंग बारीक वाटून घ्या. गॅस वर एका कढईमध्ये मोहरीचे तेल तापत ठेवा. हे तेल गरम झाले की गॅस बंद करा. आता यात हिंग घाला.
- 3
आता गॅस वर एका-दुसरे कढईमध्ये अर्धा चमचा तेल घाला. आता यात मेथी दाणे घालून चांगले लालसर भाजून घ्या. हे पाणी थंड होऊ द्या. हे मेथी दाणे मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- 4
आता एका पसरट भांड्यामध्ये तिखट हळद,मीठ मोहरीची डाळ एकत्र मिक्स करा. याच मिश्रणात थंड केलेले मोहरीचे तेल घाला.आता यामध्ये कैरीच्या फोडी घाला. ह्या फोडी या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्या. आता यावर झाकण ठेवून द्या.
- 5
आता हे लोणचे एका हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. हे लोणचे वर्षभर टिकते.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16198549















टिप्पण्या