दिवाळी विशेष भाजणीच्या चकल्या (Bhajnichya Chaklya Recipe In Marathi)

#DDR
चकली शिवाय दिवाळी फराळ हा अपूर्णच. म्हणून खास दिवाळी विशेष भाजणीच्या चकलीची रेसिपी तुमच्यासाठी.
दिवाळी विशेष भाजणीच्या चकल्या (Bhajnichya Chaklya Recipe In Marathi)
#DDR
चकली शिवाय दिवाळी फराळ हा अपूर्णच. म्हणून खास दिवाळी विशेष भाजणीच्या चकलीची रेसिपी तुमच्यासाठी.
कुकिंग सूचना
- 1
भाजणीच्या पिठात 3 चमचे गरम तेलाचे मोहन घालून घ्यावे.
आले लसुण, हिरवी मिरची, कढी पत्ता यांची एकत्र पेस्ट करून घ्यावी. - 2
एका कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात एकत्र केलेली पेस्ट शिजवून घ्यावी. त्यात ओवा, तीळ, तिखट, हळद, आमचूर पावडर आणि चवी नुसार मीठ घालून 2 मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर पाणी टाकून गरम होऊ द्यावे दोन उकळी आल्यावर गॅस बंद करावी.
- 3
गॅस बंद केल्यावर उकडीचे पाणी थंड होऊ द्यावे त्यानंतर भाजणीचे पीठ त्या पाण्याने मळून घ्यावे व दहा मिनिटं झाकून ठेवून द्यावे. दहा मिनिटांनी पुन्हा एकदा पीठ मळून घ्यावे त्याचे गोळे करून घ्यावे व चकलीच्या साच्याने चकली करून घ्यावी.
- 4
तयार झालेल्या चकल्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्या. व हलक्याशा ब्राऊन रंग येऊ द्यावा. व काढून घ्यावे. या चकल्या थंड झाल्यावर छान कुरकुरीत होतात थंड झाल्यावर छान डब्यात भरून ठेवून द्याव्या.
- 5
भाजणीच्या चकल्या दिवाळी फराळात सर्व कराव्यात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गोड शंकरपाळे (God Shankarpali Recipe In Marathi)
- जिजंर-गार्लिक -टोमॅटो सूप (Ginger Garlic Tomato Soup Recipe In Marathi)
- बटाटा-बेसन शेव (Batata Besan Shev Recipe In Marathi)
- मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)
- मँगो कोकोनट लाडू (Mango Coconut Ladoo Recipe In Marathi)









टिप्पण्या