भेंड्याची भाजी

#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी भेंड्याची भाजी चपाती, वरण आणि भात असे पूर्ण जेवणाची रेसिपी पोस्ट करत आहे.
भेंड्याची भाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी भेंड्याची भाजी चपाती, वरण आणि भात असे पूर्ण जेवणाची रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेल्यात 300 ग्रॅम
भेंडी घेऊन ती स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुऊन घेतली. नंतर भेंडी पुसून, बारीक चिरून घेतली. - 2
मग एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला. नंतर एका कढईत 2 मोठे चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा राई घालून, ती चांगली तडतडल्यावर, त्यात बारीक चिरलेला 1 कांदा घालून तो चांगला परतून घेतला.
- 3
नंतर त्यात 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 छोटा चमचा हळद घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले. आणि त्यात बारीक चिरून घेतलेली भेंडी घालून चांगली परतून घेतली.
- 4
मग त्यात चवीनुसार मीठ घालून, पुन्हा एकदा सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले. आणि झाकण ठेवून एक वाफ आल्यावर, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून भाजी चांगली शिजवून घेतली.
- 5
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम भेंड्याची भाजी. ही भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. या भाजी बरोबर चपाती, वरण आणि भात आणि भात वाढून आपले रात्रीच्या जेवणाची लज्जत खूप वाढेल.
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या