फोडणीचे वरण व भात

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

# RJR # रात्रीचे जेवण रेसिपिस # रात्रीच्या जेवणात शक्यतो हलका आहार असावा म्हणुन मी सगळ्यांच्या आवडीचा मेनु वरणभात चटणी हा केला चला तर रेसिपी बघुया

फोडणीचे वरण व भात

# RJR # रात्रीचे जेवण रेसिपिस # रात्रीच्या जेवणात शक्यतो हलका आहार असावा म्हणुन मी सगळ्यांच्या आवडीचा मेनु वरणभात चटणी हा केला चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. ४० ग्रॉम तुरडाळ+ मुगडाळ
  2. 2मिरच्या
  3. 5-6कडिपत्त्याची पाने
  4. 1टोमॅटो
  5. 1 टिस्पुनजिरे
  6. 1 टिस्पुनमोहरी
  7. 1 टिस्पुनकसुरी मेथी
  8. 1 पिंचहिंग
  9. 5-6लसुणपाकळ्या ठेचलेल्या
  10. 1 टिस्पुनकाश्मिरी तिखट
  11. चविनुसारमिठ
  12. 1 टेबलस्पुनतेल
  13. 1/4 टिस्पुनहळद

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    तुरडाळ व मुगडाळ१० मिनिटे भिजत ठेवा नंतर कुकरच्या भांड्यात डाळी व पाणी मिक्स करून ३-४ शिट्टयात डाळ शिजवुन घ्या चमच्याने डाळ घोटुन त्यात हळद, हिंग मिक्स करा

  2. 2

    पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरे, कडिपत्ता, मिरच्या, ठेचलेला लसुण घालुन परता लसुण लालसर झाल्यावर टोमॅटो व कसुरी मेथी मिक्स करा व परता नंतर त्यात काश्मिरी तिखट मिक्स करा नंतर त्यात शिजवलेली मिक्स डाळ व पाणी मिक्स करा d २-३ उकळी काढा चविनुसार मिठ मिक्स करा

  3. 3

    प्लेटमध्ये भाताची मुद वरून थोडे घट्ट वरण तसेच बाऊलमध्ये वरण व कैरी, खोबरे पुदीनाची चटणी देऊन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes