मनिषा आठरे द्वारे मलई कोफ्ते

Manisha Athare
Manisha Athare @cook_24416620

मी कोफ्ते कधीच केले नव्हते. पन आज कुकपॅडच्या थीम मुळे केले व पहिल्यांदा करून सुद्धा खुपच मस्त झाले. सर्वांना आवडले.

मनिषा आठरे द्वारे मलई कोफ्ते

मी कोफ्ते कधीच केले नव्हते. पन आज कुकपॅडच्या थीम मुळे केले व पहिल्यांदा करून सुद्धा खुपच मस्त झाले. सर्वांना आवडले.

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

30-35 मिनिटे
3-4 व्यक्ती साठी
  1. 125 ग्रामपनीर
  2. 3-4उकडलेले बटाटे
  3. 2कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 2मिरच्या
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 15-20काजू
  8. 2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनलसूण आल्याची पेस्ट
  10. आवश्यक प्रमाणात मीठ
  11. तेल

Cooking Instructions

30-35 मिनिटे
  1. 1

    प्रथम उकडलेले बटाटे मॅश करुन त्यात किसलेले पनीर घालावे. मिरचीचे काप करुन घालावे. व थोडे मीठ घालून चांगले मिक्स करून त्याचा एक गोळा करुन घ्या. व त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्यात काजुचे कापांनी स्टफ करून घ्या. व हे गोळे मंद आचेवर तळून घ्या.

  2. 2

    आता ग्रेव्ही साठी 2 बारीक चिरून घेतलेले कांदे व टोमॅटो परतुन घ्या. नंतर लसूण आल्याची पेस्ट टाकून पुन्हा चांगले परतून घ्या. व घट्टपणासाठी थोडे काजू टाकावे. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्यावी. व नंतर कढई तेल गरम करून तयार केलेली पेस्ट टाकून पुन्हा चांगले परतून घ्यावे. व आता यामध्ये लाल तिखट गरम मसाला मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. आवश्यक प्रमाणात पाणी घालावे. नंतर गॅस बंद करून त्यात थोडी फ्रेश क्रीम घालावी.

  3. 3

    एका डिशमध्ये कोफ्ते ठेवून त्यावर तयार ग्रेव्ही टाकून वरून पुन्हा थोडे क्रीम घालून सर्व्ह करावे.

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Athare
Manisha Athare @cook_24416620
on

Comments

Similar Recipes