चीज मसाला पुरी

सुहिता धनंजय
सुहिता धनंजय @cook_28112504

#GA4 #WEEK17 #Keyword_चीज
काय फोटो बघताच तोंडाला पाणी सुटले ना!😋😋 पाणीपुरी म्हणजे जणू जीव की प्राण! 😍😍फिरायला बाहेर पडल्यावर एक प्लेट पाणीपुरी खाऊनच घरी यायचे हा अलिखित नियम सगळ्यांचाच घरात आहे🏠. हो की नाही ? 😃😃
पाणीपुरी, पुचका, गोलगप्पे अशा असंख्य नावांनी ओळखल्या जाणाऱ्या ह्या पाणीपुरीचे शेवपुरी, दहीपुरी, मसालापुरी, चॉकलेट पुरी, रगदापुरी, चायनीज पुरी इ. अनेक प्रकार जगप्रसिद्ध आहेत. ह्या पाणीपुरीचा शोध कोणी लावला आहे ठावूक नाही पण प्रत्येक पुरी खाताना त्या व्यक्तीचे आभार जन्मभर मानायला हवेत 😉 अशीच एक चटपटीत व चिजी मसाला पुरी मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहे. चला तर मग पाहूया.. चीज मसाला पुरी!!

Edit recipe
See report
Share
Share

Ingredients

१० मिनिटे
२ व्यक्ती
  1. २-३ चीज क्युब्स
  2. १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
  3. १ मध्यम उकडलेला बटाटा
  4. अर्धी वाटी चिंचेचे पाणी
  5. अर्धी वाटी बारीक शेव
  6. अर्धी वाटी खारी बुंदी
  7. १०-१२ पुऱ्या
  8. १ टी- स्पून तिखट
  9. १ टी- स्पून चाट मसाला
  10. १ टी- स्पून मीठ
  11. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर

Cooking Instructions

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका डिश मध्ये १०-१२ पुऱ्या काढून त्यात मध्यभागी एकसारखी छिद्रे करून घ्यावीत.

  2. 2

    उकडलेला बटाटा मॅश करून त्यात चवीनुसार मीठ, तिखट, चाट मसाला इ. घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    आपण छिद्रे केलेल्या पुऱ्यांमध्ये बटाट्याचे मिश्रण थोडे थोडे भरावे. व नंतर त्यावर एक-एक चमचा प्रत्येकी चिंचेचे पाणी घालावे.

  4. 4

    ह्यानंतर पुऱ्यांमध्ये खारी बुंदी, बारीक चिरलेला कांदा घालावा.

  5. 5

    बारीक शेव, तिखट, मीठ व चाट मसाला इ. चवीनुसार घालावे

  6. 6

    आणि आपला मुख्य घटक चीज! किसणीने सर्व पुऱ्यांवर चीज एकसारखे किसून घ्यावे. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून क्षणाचाही विलंब न करता आपल्या चीजी अशा चीज मसाला पुरीचा आस्वाद घ्यावा.

Edit recipe
See report
Share

Cooksnaps

Did you make this recipe? Share a picture of your creation!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुहिता धनंजय
on

Similar Recipes