मलबारी अप्पम् विथ पोटॅटो स्टयू (appam with potato stew recipe in marathi)

#BFR माझ्या भावाचं लव्ह मैरेज झालं आहे. माझी वहिनी केरळ ची आहे .तशी ती म्हणायला केरळ ची आहे. पण, लहानपणापासून हैदराबाद ला राहिल्यामुळे केरळी तसंच तेलगू सुद्धा रेसिपीज तिला माहिती आहे. त्यामुळं, भावाची पर्यायाने आमची सुध्दा चांदीच चांदी झाली. लग्नाच्या बोलणीसाठी हैदराबाद ला गेल्यावर त्यांच्या घरी अप्पम् आणि स्ट्यू पहिल्यांदा चाखला आणि आम्ही सगळे अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलो.
मग काय! तिथल्याच एका भल्या मोठ्ठ्या मॉलमधल्या भांड्याच्या दुकानात (🙄😂) अप्पाचेट्टीची यथासांग खरेदी पार पडली. अप्पाचेट्टी म्हणजे अप्पम् बनवण्यासाठी लागणारं छोटं उथळ / खोलगट कढईवजा पात्र! माझं लग्न काही महिन्यांवर आल्यामुळं माझ्यासाठीही मला एक मिळालं. लग्नानंतर मात्र मी अप्पाचेट्टी चांगलीच चेपेतोवर वापरली आणि अजूनही वापरते आहे.
अप्पम् हा जाळीदार डोशाचा प्रकार आहे जो मधोमध इडलीसारखा हलका जाड आणि बाजूने अगदी पेपर डोसाच! यीस्ट घालून फर्मेंट केल्याने त्याची चव आणि गुणधर्मांमध्ये खूपच फरक पडतो. पूर्वी जेव्हा यीस्ट चा शोध लागला नव्हता तेव्हा त्यात नारळाचं पाणी घालून फर्मेंट केलं जायचं. पावासारखे मऊ, लुसलुशीत, जाळीदार, हलके आणि चवीला किंचित गोडसर असणारे हे अप्पम् खरंतर व्हेज / नॉनव्हेज स्ट्यू , कुर्मा, अंडाकरी सोबत खातात. "स्ट्यू" ही नारळाच्या दूधातली व्हेज किंवा नॉनव्हेज करी असते. ह्याची चव थोडीफार कोल्हापूरी पांढऱ्या रश्श्याच्या किंवा दूधसाराच्या जवळपास जाते. दूधसारमध्ये मात्र हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट वापरतात. चला तर मग बघूया ही नाविन्यपूर्ण दाक्षिणात्य रेसिपी !

कुकिंग सूचना
- 1
सगळयात आधी, तांदूळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तासांसाठी भिजत घालावे. नंतर वाटून घेताना थोडे पोहे, थोडं ओलं खोबरं आणि ईस्ट घालून गुळगुळीत वाटून घ्यावे.
- 2
पोहे भिजत घालण्याची आवश्यकता नाही. वाटलेलं मिश्रण ७ - ८ तास रुबवण्यासाठी ठेवून द्यावे.
- 3
पोटॅटो स्ट्यू बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका छोट्या पातेल्यात २ वाट्या पाणी गरम (उकळवून अपेक्षित नाही) करावे आणि त्यात नारळाच्या दूधाची पावडर विरघळवून घ्यावी. हे झाले नारळाचे दूध तयार! मी इथे पावडर वापरली आहे. तुम्हांला जमत असल्यास नारळ खोवून त्यापासून बनलेले दूध ही वापरु शकता.
- 4
नंतर; ओलं खोबरं + आलं + लसूण + हिरव्या मिरच्यांचे वाटण काढावे. एका कढल्यात, तेल गरम करून हिंग आणि अख्ख्या खड्या मसाल्याची फोडणी करावी. त्यातच, बारीक चिरलेला कांदा तळसून घेऊन वाटण घालून तेही नीट परतवून घ्यावे.
- 5
तयार नारळाचे दूध + १ वाटी नेहमीचे दूध + १ वाटी पाणी वाटणात ओतून मिक्स करावे. नंतर त्या आधणात बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घालून नीट ढवळून बारीक गॅसवर शिजू द्यावे. (गरम मसाल्याने पांढऱ्या करीला झणझणीतपणा येतो.) कढीप्रमाणे पळीने ढवळत ढवळत उकळावे. दूध + मीठामुळे जर रटरटीत शिजवला तर स्ट्यू फाटू शकतो. आपला पोटॅटो स्ट्यू तयार आहे.
- 6
अप्पाचेट्टी गॅसवर तापत ठेवावी. (त्याऐवजी, कोणतीही कान असलेली खोलगट छोटी कढई वापरू शकता). त्या दरम्यान, थोडं फर्मेंटेंड पीठ एका दुसऱ्या भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ आणि २ चिमुटभर बेकिंग सोडा घालून एकाच दिशेने फिरवून मिक्स करावे.
- 7
भांडं तापल्यावर १ पळीभर अप्पम् पीठ ओतावे. पटकन कढई दोन्ही कानांना पकडून पीठ कढई भर गोलाकार फिरवावे. कडांना काही थेंब तेल सोडून १ मिनीटभरासाठी झाकण लावून शिजवावे.
- 8
आपले अप्पम् तयार आहेत.
- 9
तयार अप्पम् स्टयू सोबत सर्व्ह करावे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (11)