मसाले भात (masale bhaat recipe in marathi)

Foodyummme @cook_29324051
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. भाज्या चिरून. धुवून घ्या.कुकर गरम करून त्या मध्ये 2 पळी तेल गरम करा.
- 2
शेंगदाणे, काजू तळून घ्यावेत. नंतर जीरे, तमालपत्र, 3-4 लवंग, दालचिनी टाकून भाजुन घ्या. आता आलं-लसूण पेस्ट टाका.
- 3
नंतर मसाले टाका.भाज्या टाकुन परतून घ्यावे.तळलेले काजू दाणे टाकले.आता धुतलेले तांदूळ टाकून हलवून घ्या..3 वाटी पाणी गरम करून ओतले. चवीनुसार मीठ घालून वरून थोडेसे तुप सोडा..कुकरच्या 3 शिट्ट्या काढा..मसाले भात तयार..।
Similar Recipes
-
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#KS6जत्रा फूड... इंद्रायणी थडी जत्रा भोसरी-पुणे इथे भरते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण इथल्या पदार्थांची रेलचेल असते. मावळातील इंद्रायणी तांदळाचा 'मसाले भात'ह्या जत्रेत पहायला मिळतो. म्हणून जत्रेत बनवला जाणारा मसालेभात केला आहे. Manisha Shete - Vispute -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRमसाले भात हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वी लग्नाच्या पंगती मसाले भात आणि मठ्ठा याशिवाय उठतच नव्हत्या. आता पंगत भोजन राहिले नाही. आणि पारंपरिक पदार्थ ही दिसेनासे झाले.जग जवळ येत चालले आणि आपल्या पदार्थांची जागा जगातील इतर पदार्थानी घ्यायला सुरवात केली.मसाले भाताची जागा वेगवेगळ्या राईसने तर कोशिंबीर चटण्याची सलाड ने घेतली. असो जागा बरोबर आपल्याला चालावच लागणार. पण आपल्या कूकपॅडने आपल्याला वेगळे कॉन्सेप्ट देऊन आपली संस्कृतीआणि आपली परंपरा जपलेय. Shama Mangale -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
महाराष्ट्रात सणावाराला आणि लग्न समारंभात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Arya Paradkar -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GR मसाले भात नाव ऐकताच आठवण येते ती लग्नामध्यील पंक्तीची...... काजू भाज्या वापरुन केलेला चविष्ट भात आणि वरून घातलेली कोथिंबीर खोबरे आणि तूप घालून अहाहा काय सुंदर सुवास असतो या भाताला... आणि चव तर काय अप्रतिम.... मी आज हा मसालेभात लग्नामध्यील पंक्तीमध्ये असतो तसा करायचा प्रयत्न केला आहे पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी.... Rajashri Deodhar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
-
महाराष्ट्रीयन मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन मसाले भात आज मी गुढीपाडव्याच्या निमित्त बनवला आहे मेघा जमदाडे ताई यांची मी रेसिपी कूकस्नॅप केली आहे थोडासा बदल करून मसालेभात बनवला आहे, खूपच मस्त लागत आहे घरच्यांनाही खूप आवडला. चला तर मग बघुया सणासुदीला बनवला जाणारा महाराष्ट्रीयन मसाले भात कसा बनवायचा😘🙏 Vandana Shelar -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी लंच मध्ये मसाले भात बनवला आहे. पूर्वी लग्नात मसाले भात, मठ्ठा आणि जिलेबी हा बेत असायचाच.. आता लग्न समारंभात वेगळे पदार्थ तयार करतात.. Shama Mangale -
-
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
-
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1#महाराष्टात लग्नाच्या पंगतीत केला जाणारा पारंपारिक मसाले भात . Hema Wane -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnapरुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली. Manisha Shete - Vispute -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRआमच्या गावाकडे बनवल्या जाणार्या पदार्थांमधला माझा सगळ्यात आवडता पदार्थ मसाले भात हा आहे. शुभ कार्य आणि लग्न समारंभात प्रामुख्याने या मसाले भाताचा समावेश केला जातो. त्यावेळी यामधे कांदा घालत नाहीत. भाज्या आपल्या आवडीनुसार घालू शकतो. भाजलेल्या गरम मसाल्याची पावडर, तूप आणि गोडा मसाला घालून केलेल्या मसाले भाताचा दरवळणारा सुगंध आल्यावर खवय्यांची भुक चाळवल्या शिवाय रहात नाही. गरमागरम वाफाळता चमचमीत आणि थोडासा तिखट अशा मोकळ्या मसाले भातावर ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार पडून कधी एकदा खायला मिळतोय असं होतं. तर आता सोप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या चविष्ट मसाले भाताची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#स्नॅक्स# साप्ताहिक_ लंच# शुक्रवार _मसालेभात नंदिनी अभ्यंकर -
मसाले भात (masala bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार #महाराष्ट्रातील पारंपरिक मसाले भात पुर्वी नेहमी लग्नसमारंभात केला जायचा हल्ली विसरलेत सर्व. Hema Wane -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#tmr#तीस मिनिट रेसिपी चॅलेंजहा भात पटकन झटपट होतो सर्व भाज्या चिरल्या पूर्वतयारी केली की पटकन कुकरला लावता येतो म्हणजे गर्मीत गॅस जवळ जास्त थांबायला नको चला तर मग बघुया झटपट मसाले भात Sapna Sawaji -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 4महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो. आमच्या कोकणात आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा, विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार ,गाजर ,बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मसाले भात मला खूप आवडतो. तसाच मसाले भात बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे त्यांनी हा भात जरुर खावा. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. स्मिता जाधव -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14744598
टिप्पण्या