सुरती उंधियु

Anuja Pandit Jaybhaye
Anuja Pandit Jaybhaye @cook_19620906

#myfirstrecipe

नमस्कार सखींनो 🙏
Cookpad community वरील ही माझी पहिली वहिली पोस्ट.
मग काही हटके, जोरदार नको व्हायला.
मस्तच थंडी पडली आहे, गुलाबी मौसम है...
तो चलो कुछ तुफानी करते है..😜
मैत्रिणींनो माझी आजची रेसिपी आहे ...
मस्त चमचमीत, चविष्ट आणि पारंपरिक,
" सुरती उंधियु "

सुरती उंधियु

#myfirstrecipe

नमस्कार सखींनो 🙏
Cookpad community वरील ही माझी पहिली वहिली पोस्ट.
मग काही हटके, जोरदार नको व्हायला.
मस्तच थंडी पडली आहे, गुलाबी मौसम है...
तो चलो कुछ तुफानी करते है..😜
मैत्रिणींनो माझी आजची रेसिपी आहे ...
मस्त चमचमीत, चविष्ट आणि पारंपरिक,
" सुरती उंधियु "

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. मसालामिक्स साहित्य
  2. १०० ग्रॅम ओला हिरवा लसुण पाकळ्या
  3. १/३ ओले खोबरे
  4. ४ टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  5. ४ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. १ टेबलस्पून कच्चे शेंगदाणे
  7. २ टेबलस्पून खिसलेले सुके खोबरे
  8. २ टेबलस्पून साखर
  9. १ टेबलस्पून कच्चे तीळ
  10. १ टीस्पून हळद
  11. १ टीस्पून गरम मसाला
  12. १ टीस्पून ओवा
  13. १ टेबलस्पून मीठ
  14. १/२ टीस्पून हिंग
  15. १०० ग्रॅम बारीक चिरलेली ओल्या लसणाची पात
  16. मेथीच्या मुठीयांचे साहित्य-
  17. १ जुडी मेथी धुऊन बारीक चिरून
  18. १ वाटी गव्हाचे पीठ
  19. १ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
  20. १/२ टीस्पून ओवा
  21. १ टेबलस्पून दही
  22. १ टेबलस्पून मीठ
  23. १ टेबलस्पून तेल
  24. १/२ टीस्पून हळद
  25. १ टेबलस्पून धणेजिरे पावडर
  26. १/२ टीस्पून साखर
  27. १ टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  28. उंधियुसाठी लागणा-या भाज्या-
  29. ५०० ग्रॅम सुरती पापडी
  30. १/२ कप मटार
  31. १/२ कप तुरीचे दाणे
  32. १०० ग्रॅम रताळी
  33. २०० ग्रॅम बटाटे
  34. १५० ग्रॅम कंद (purple yum)
  35. ताजी लहान आकाराची वांगी
  36. कच्चे केळे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेऊन मध्यम आकारात चिरून घ्याव्या. वांग्याचे अर्धे देठ काढून त्याला चार काप करून घ्यावे. केळ्याला देखील साल न काढता अर्धी चिर द्यावी.

  2. 2

    मिक्सर च्या भांड्यात ओल्या लसणाच्या पाकळ्या, १ टेबलस्पून कोथिंबीर, शेंगदाणे, कापलेले ओले खोबरे एकत्र करून पाणी न चालता दरदरीत वाटून घ्यावे. त्याचप्रमाणे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    आता मिक्सर मध्ये वाटलेला मसाला एका भांड्यात घेऊन त्यात २ टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालावी. खिसलेले सुके खोबरे, तीळ, १/२ टी स्पून ओवा, हळद, धणे जिरे पावडर,गरम मसाला, मीठ, साखर,हिंग, तेल घालून चांगले मिक्स करून घ्यावे.व त्यातील अर्धा मसाला बाजूला ठेवून उरलेल्या अर्ध्या मसाल्यात बटाटे, कंद, रताळ घालून चांगले मिक्स करून १० मिनीटांसाठी बाजूला ठेवून द्यावे.

  4. 4

    बाजूला ठेवलेल्या मसाल्यातील काही मसाला चिर दिलेली वांगी आणि केळ्यांमध्ये योग्य प्रमाणात भरावा.

  5. 5

    आता करूया मेथीच्या मुठीयांची तयारी. प्रथम धुऊन बारीक चिरलेली मेथी एका भांड्यात घेऊन त्यात १ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, १/२ टी स्पून ओवा, १/२ हळद, १ टेबलस्पून धणे जिरे पावडर, १ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, १/२ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून मीठ, १/२ टी स्पून साखर सर्व छान हाताने मिक्स करून घ्यावे. शक्यतो पाणी न घालता धुतलेल्या मेथीच्या ओलसरपणातच पीठ मळून घ्यावे.

  6. 6

    आता हा पीठाचा गोळा १० मिनीटे बाजूला ठेवावा. १० मिनीटांनंतर त्या पीठाचे लहान लहान गोळे करून मध्यम आचेवर तळून घ्यावेत.

  7. 7

    गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवून कुकरमध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर त्यात १/२ की स्पून ओवा, १/२ हिंग, १/२ टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून नंतर त्यात सुरती पापडी, तुरीचे दाणे, मटार,शिल्लक असलेला मसालामिक्स घालून चांगले परतावे. आता सर्वप्रथम मेरिनेट केलेले बटाटा, कंद, रताळ घालून त्यावर भरलेली वांगी आणि केळी ठेवावी सर्वात शेवटी त्यावर तळलेले मुठीया आणि ओल्या लसणाची बारीक चिरलेली पात आणि कोथिंबीर घालून २ कप भर पाणी घालून कुकरचे झाकण लावून त्यावर शिट्टी लावून ३ शिट्टया करून घ्याव्यात.

  8. 8

    कुकर थंड झाल्यावर उंधियु बाऊल मध्ये काढून सर्व्ह करावे. सोबत भाजलेला पापड, बाजरीची भाकरी किंवा फुलके, मसाला खिचडी आणि काठीयावाडी कढी.....

  9. 9

    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja Pandit Jaybhaye
Anuja Pandit Jaybhaye @cook_19620906
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes