उंधियो (Undhiyo recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

थंडी च्या दिवसात बाजारात खुप साऱ्या रंगीबेरंगी भाज्या मिळतात.. या काही भाज्या मिळून केलेली मिक्स भाजी म्हणजेच उंधियो
गुजराथ मधील स्पेशल डिश...मी हा कुकरमधे झटपट उंधियो केला आहे
#EB9 #W9

उंधियो (Undhiyo recipe in marathi)

थंडी च्या दिवसात बाजारात खुप साऱ्या रंगीबेरंगी भाज्या मिळतात.. या काही भाज्या मिळून केलेली मिक्स भाजी म्हणजेच उंधियो
गुजराथ मधील स्पेशल डिश...मी हा कुकरमधे झटपट उंधियो केला आहे
#EB9 #W9

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45- मिनिटं
4-5 सर्व्हिंग्ज
  1. मुठिया बनवण्याकरिता....
  2. 1 वाटीबारीक चिरलेली मेथी
  3. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 1 वाटीबेसन
  5. 1/4 वाटीगव्हाचे जाडसर पीठ.. किंवा बारीक रवा
  6. 1 टेबलस्पूनआलं-लसूण-मिरची पेस्ट
  7. 1/2 चमचाओवा
  8. 1/2तीळ
  9. 1 चमचातिखट
  10. 1 चमचाधणे-जीरे पूड
  11. 1/2 चमचाहळद
  12. 1 चमचातेला चे मोहन
  13. चवीनुसारमीठ
  14. तळण्यासाठी तेल
  15. मसाला वाटण्या साठी साहित्य....
  16. 1 वाटीओलं खोबरं
  17. 2 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे
  18. 1/4 वाटीतीळ
  19. 1/2 वाटीबारीक चिरलेली लसूण पात
  20. 1 चमचाआलं-मिरची पेस्ट
  21. 1/2 वाटीकोथिंबीर
  22. 2 चमचेओवा
  23. 1/2 लिंबाचा रस
  24. 1/2 चमचासाखर
  25. भाज्या...
  26. 1 वाटीसोललेली सुरती पापडी
  27. 1/2 वाटीवाला च्या शेंगांचे दाणे
  28. 1/4 वाटीतुरीच्या शेंगा चे दाणे
  29. 2 चमचेमटार दाणे
  30. 4-5छोटे बटाटे
  31. 3-4वांगी
  32. 5-6कोनफळाचे मोठे तुकडे
  33. 1कच्चे केळे
  34. 1रताळ
  35. फोडणी साठी मुठिया तळून उरलेले तेल-जीरे -ओवा-तीळ-हिंग
  36. 1/2 चमचाहळद
  37. 1.5 चमचातिखट
  38. 1/2 चमचागरम मसाला
  39. चवीनुसारमीठ
  40. वरून घालण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

45- मिनिटं
  1. 1

    मुठिया साठी असणारे सर्व साहित्य एकत्र करून गोळा मळून घ्या.झाकून ठेवा. अर्ध्या तासा नंतर त्याचे लांबट मुठिया करून गरम तेलात खरपूस तळून घ्या

  2. 2

    मसाल्यासाठी असणारे सर्व साहित्य मिक्सर मधून वाटून घ्या.

  3. 3

    कुकर मधे जरा जास्त तेलाची फोडणी करा त्यात जीरे ओवा तीळ हिंग घाला. सुरती पापडी, वाल-तूर-मटार दाणे घाला.त्या वर वाटलेला मसाला घालून परतवून घ्या मग त्यात कोनफळ सुरण कच्च्या केळ्याचे काप घाला. तिखट-गरम मसाला व चवीनुसार मीठ घाला.
    तळलेले मुठिया घाला.
    थोडेसे पाणी घालून कुकर ला दोन शिट्या येईपर्यंत शिजवा.

  4. 4

    नंतर उंधियो वर वरून कोथिंबीर पेरा.. सुरती उंधियो खाण्यासाठी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes