सुरती उंधियो (undhiyo recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB9 #W9
उंधियो आणि थंडी यांचही अतूट नातं आहे बरं का!उंधियु ही गुजरातची खास भाजी.गुजराती शब्द उंधु म्हणजे वरची बाजू खाली....कारण पारंपारिक गुजराती उंधियु हा जमिनिखाली खड्डा करुन मातीच्या मडक्यात (माटलु-गुजराती शब्द)वरची बाजू खाली करुन वरुन खालून धग लावून खूप वेळ शिजवून केलेला असतो.आपण करताना मोठी कढई किंवा प्रेशरकुकरही वापरु शकतो.आपल्याकडे संक्रांतीच्या भोगीला लेकुरवाळी भाजी करतो तशीच ही सुद्धा एक मिक्स व्हेजच म्हणा ना!
खरंतर सगळ्यांचाच हा खूप आवडता पदार्थ.गेली अनेक वर्ष आमच्याकडे थंडीत उंधियो ठरलेलाच आहे.आणि करतेही खूप प्रमाणात.मी करायला तयार आणि खवैय्ये खायला तयार😋😋
अथक तयारी करुन सगळ्या रंगीबेरंगी भाज्या ओट्यावर जमवल्या की एक फेज पार पडले...☘️🌱🍆🥔🥥 अप्रतिम काॅंबिनेशन पाहून नेत्रसुखद आनंद मिळतो तो कॅमेरा बंद करायलाच हवा😃
बाकी पुढेही क्लिष्ट काम म्हणजे भाज्या तळणे,मसाले करणे,भरणे,मुठीया करणे म्हणजे खमंग वासांनीच रसना तृप्ती!😃जेव्हा पातेल्यात/कुकरमधे शेवटी या भाज्यांचे थर उतरतात तेव्हा कार्यसमाप्तीची जाणिव होऊ लागते आणि भरपूर ओवा आणि मसाल्यांचा दरवळ सुटू लागला की हुश्श करत जरा डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर टेकायचे!!🤣
आपल्या भोगीच्या भाजीचे जसे संक्रांतीला महत्त्व तसे गुजरातेत उंधियुचे!आणि चव वर्षभर जीभेवर रेंगाळणारी....करायला खूपच किचकट आणि वेळखाऊ,चिराचिरी,सोलणे,निवडणे,धुणे यासाठी १-२दिवस पूर्वतयारी आवश्यक!....इतका त्रास असतानाही तो करण्याची मजा औरच....माझा सर्वात आवडता पदार्थ!!पण एकदा केला की २-३दिवस सहज खाता येतो...अर्थात फ्रीजमधे ठेवून..लागेल तसा गरम करुनच...थंडीत तर गरमागरम उंधियोचा स्वाद तर घ्यायलाच हवा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3ते3:30 तास
15-17व्यक्ती
  1. उंधियोसाठी लागणाऱ्या भाज्या
  2. 1/2सुरती पापडी
  3. 1/4 किलोवाल पापडी
  4. 1/4 किलोपावटा दाणे
  5. 100 ग्रॅमशेंगांचे दाणे
  6. 100 ग्रॅमओले हरभरे
  7. 1/4 किलोमटार दाणे सोलून
  8. 1/2 किलोसुरण
  9. 6 नगकेळी (कमी पिकलेली)
  10. 1/2 किलोकोनफळ
  11. 1/2 किलोबटाटे छोटे
  12. 1/2 किलोकाटे वांगी छोटी
  13. 1/4 किलोरताळी
  14. 1जुडी लसूणपात
  15. 2जुड्या मेथी
  16. उंधियो - भाज्यांना लावून ठेवण्यासाठी ओला मसाला(marination)
  17. 10 टेबलस्पूनधणेजीरे पूड
  18. 5 टेबलस्पूनब्याडगी मिरची तिखट
  19. 4 टेबलस्पूनगरम मसाला
  20. 3 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  21. 2नारळ खोवून नारळाचा चव
  22. 1/2जुडी कोथिंबीर चिरुन
  23. मीठ चवीनुसार
  24. 3लिंबाचा रस
  25. 4 टीस्पूनओवा फोडणीसाठी
  26. 1.5 चमचाखायचा सोडा (1च.पापडीला लावण्यास + 1/2च.मुठीयामध्ये घालण्यास)
  27. मेथीचे मुठीया/मुटके
  28. 8 डावकणिक
  29. 2 डावहरभरा डाळीचे पीठ
  30. 1जुडी लसूणपात बारीक चिरलेली
  31. 3मोठे डाव तेलाचे मोहन
  32. मेथी निवडून,धुवून,कोरडी करुन बारीक चिरलेली
  33. 2 टीस्पूनआलं मिरची पेस्ट
  34. 1/2 टीस्पूनहिंग
  35. 1.5 टीस्पूनहळद
  36. 2 टीस्पूनमीठ
  37. 2 टीस्पूनपीठीसाखर
  38. 1 टीस्पूनओवा
  39. 1 टीस्पूनतीळ
  40. 1/2 छोटा चमचाखायचा सोडा
  41. 4-5 कपगरम पाणी जरुरीनुसार
  42. 3/4 किलोतेल

कुकिंग सूचना

3ते3:30 तास
  1. 1

    खाली छोटासा व्हिडीओ केला आहे उंधियोसाठी लागणाऱ्या भाज्यांचा.त्यानुसार मंडईतून या भाज्या आणाव्यात.😊वरील भाज्यांच्या लिस्टप्रमाणे भाज्या आणाव्यात.व्यक्ती कमी असतील तर त्या प्रमाणात भाज्या व मसाले घ्यावेत.

  2. 2

    1)नारळ खोवून ठेवावा.कोथिंबीर, लसूणपात चिरावी.आलं-मिरची पेस्ट करावी.लिंबांचा रस काढून ठेवावा.आलं-लसूण पेस्ट करावी.
    2)वरील मसाल्याचे सर्व साहित्य तयार ठेवावे-धणेपूड,जीरे पूड,तिखट,गरम मसाला,ओवा,पीठीसाखर, हळद,मीठ,तीळ.
    3)हरभरे,मटार,पावटा,तूर यांचे दाणे सोलून घ्यावेत.सुरती पापडी,वालवर शेंगा सोलाव्यात.

  3. 3

    कंदभाज्या चिरणे:-
    उंधियोमध्ये सुरण,रताळे,बटाटे,कोनफळ या कंदभाज्यांची सुरेख चव लागते.या सगळ्याच्या मोठ्या फोडी कराव्यात.कारण शिजून आकार लहान होतो.यातले कोनफळ चिरायला थोडे चिकट असते.पण तो चिकटपणा भाजीत रहात नाही.वांगी नेहमीप्रमाणे मध्ये चीर देऊन चिरावीत. केळी मध्यम आकाराची चिरावीत.

  4. 4

    बटाटे,सुरण,रताळी,कोनफळ यांची साले काढून मोठ्या फोडी कराव्यात.या सर्व कंदभाज्या चिरल्यावर आपल्याला एकेक करून तळायच्या आहेत.तळतानाच त्या बऱ्यापैकी शिजतात.त्यासाठी मेथीचे मुटके तळून झाल्यावरचे उरलेले तेल वापरायचे आहे.तोच मेथीचा स्वाद या सर्व भाज्यांमध्ये उतरतो.

  5. 5

    एकीकडे सोललेली सुरती पापडी,वालाच्या शेंगा व मटार,तूर,पावटा,हरभरे याचे दाणे यांना थोडेसे तेल व खायचा सोडा लावून थोडा वेळ अगोदरच ठेवावे.यामुळे पापडी व दाणे व्यवस्थित शिजतात.रंग तसाच रहातो.

  6. 6

    आता मेथीचा मुठीया करुन घ्यायचा आहे.यासाठी कोवळी मेथी निवडून, धुवून, बारीक चिरावी.मेथीचा मुठीया या विभागात दिल्याप्रमाणे कणिक,हरभरा डाळीचे पीठ,तेलाचे मोहन,तिखट,मीठ,ओवा,तीळ,चिरलेली ताजी लसूणपात, धणेजीरे पूड,आलंमिरची पेस्ट,हळद,हिंग,पीठीसाखर,किंचीत सोडा व 2चमचे लिंबाचा रस घालून मुठीयासाठी पीठ भिजवावे.पाणी जास्त लागत नाही.मुठीयासाठी घट्टच पीठ असावे.

  7. 7

    छोटे छोटे गोल/लांबट मुठीया वळून ठेवावेत.कढईत तेल तापत ठेवावे.तेल तापले की त्यात सोनेरी खरपूस रंगावर हे मुटके/मुठीया तळून घ्यावेत.

  8. 8

    आता मुठीया तळलेल्या तेलात सर्व कंदभाज्या क्रमाक्रमाने तळून घ्याव्यात.भाज्या तळल्यामुळे खरपूसपणा येतो.तसेच तेलात थोड्या शिजतातही.त्यामुळे नंतरचा शिजवण्याचा वेळ कमी होतो.आणि भाज्या overcookही होत नाहीत.चवही मस्त लागते.

    *एकीकडे सुरतीपापडी,वालशेंगा आणि सर्व प्रकारचे दाणे मायक्रोवेव्हमध्ये 10-12मिनिटे 80%पॉवरवर उकडून घ्याव्यात.किंवा कुकरमध्ये बारीक गँसवर 12-15मिनिटे शिट्टी न लावता उकडून घ्याव्यात.

  9. 9

    भाज्यांना मसाला लावण्यासाठी:-
    नारळ चव भरपूर घातला की उंधियो ओलसर असा खाताना छान लागतो.नारळाचा चव,आलं-मिरची पेस्ट,कोथिंबीर याची पेस्ट करुन घ्यावी.यात चवीनुसार मीठ घालावे.व वरील मसाला साहित्यातील धणेजीरे पूड,गरम मसाला,तिखट असे एकत्र करुन मसाला तयार करावा.व नंतर भाज्यांना तळून झाल्यावर लावून थोडावेळ मुरु द्यावा.उरलेला मसाला भाजी पूर्ण शिजवताना त्यातील लेअर्समध्ये घालावा.

  10. 10

    वांग्यांमध्येही हा मसाला भरून ठेवावा.व वांगीही तेलावर थोडी शिजवून घ्यावीत.
    याप्रमाणे आता सगळ्या भाज्या तळून व मसाल्याने मँरिनेट करुन झाल्या आहेत.

  11. 11

    आता मोठ्या पातेल्यात भाज्या तळून उरलेले जे तेल असेल ते सगळे घालावे.तेल जास्त होत नाही.ओवा,हळद,आलं-लसूण पेस्ट घालून फोडणी करुन भाज्यांचे शिजण्यास लागणाऱ्या वेळेनुसार थर करायचे आहेत.प्रथम फोडणीवर मायक्रोवेव्ह मध्ये उकडलेल्या पापडी शेंगा,सर्व दाणे घालावेत.थोडे परतावे.यावर ओला मसाला,मीठ व घालावे.बटाटे,सुरण,कोनफळ,रताळी ह्या मसाला लावलेल्या भाज्या घालाव्यात.त्याही परताव्यात.पुन्हा ओल्या मसाल्याचे वाटण,मीठ व पाणी घालावे.यावर तळलेल्या केळाच्या फोडींवर मसाला घालून भाजी तळापासून हलवावी.

  12. 12

    नंतर शेवटी भरलेली वांगी घालावीत.उरलेल्या सर्व ओला मसाल्याचे वाटण,मीठ व पाणी घालावे.भाजी व्यवस्थित हलवावी.मीठ अंदाज घेत घेत घालावे.शेवटी तळलेले मेथीचे मुठीया व काही मुठीया कुस्करून घालावे.
    👇अशाप्रकारे मोठ्या पातेल्यात हा उंधियो तयार झाला आहे.20-25मिनिटे पातेल्यावर झाकण घालून उंधियो मंद गँसवर शिजवण्यास ठेवावा.

  13. 13

    अगदी नेहमी वापरातले साधेसेच मसाले असले तरी यातली ओव्याची चव फार सुंदर लागते,तसेच ओल्या नारळामुळे उंधियो कोरडा होत नाही.भाज्या तळल्यामुळे लवकर शिजतात.त्यामुळे मोठ्या प्रमाणात जरी करायचा असला तरी चव मात्र तीच अफलातून लागते.
    आता उंधियो तयार आहे.....घरभर भाज्या,मुठीया,मसाले यांचा मस्त सुगंध येतो आहे.सगळ्यांना भूकही लागलीये...खवैय्ये दर्दी आहेत.गरमागरम उंधियो फुलके किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावा.सोबत तीळाची चटणी,कढी,खिचडी आणि गाजरहलवा...चला तर.....या....उंधियोचा आस्वाद घ्यायला!🤗🤗😋👍👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes