#चटणी #आवळा चटणी

Pranita Kulkarni @cook_19254299
कुकिंग सूचना
- 1
कढई तापत ठेवा. त्यात एक चमचा तेल टाकून जिरे मिरच्या लसूण भाजून कडून घ्या. त्याच कढईत आवळा फोडी घालून 1 मिनिट परतून त्यावर झाकण ठेवून वाफ काढावी. गॅस बंद करावा.
- 2
मिक्सर च्या भांड्यात सर्व साहित्य टाकून घ्यावे. थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे.
- 3
चटणी तयार आहे. बाऊल मध्ये काढून घ्या.
- 4
आवडत असल्यास त्यावर तेलाची फोडणी करावी.तेलात जिरे मोहोरी हिंग कढी पत्ता टाकून चटणी वर टाकून घ्यावी.मस्त खमंग वास येतो फोडणीचा चटणीला आणि चवही खुप छान लागते.
- 5
आता चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी 3 ते 4 दिवस सहज टिकते.डीप फ्रीजमध्ये ठेवल्यास महिनाभर टिकते.
- 6
कशा सोबत खाऊ शकतो? तर काशाच्याही सोबत खाऊ शकतो. पोळी,पराठा,ठेपला,भाकरी,थालीपीठ, घावण.....सँडविच, फ्रँकी मध्ये लावू शकतो खुप छान लागते. डीप म्हणून वापरू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
जांब +आवळा चटणी
घरात जांब आणि आवळे दोन्ही होते ते कोणी खायला तयार नव्हते कसंही करून सगळ्यांना खाऊ तर घालायचे होते म्हणून चटणीची आयडिया सुचली आणि भन्नाट चटकदार झाली. Pragati Hakim -
आवळा भात / Amla Rice Recipe In Marathi )
#GA4 #week11Amla या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
आवळा चटणी (aawda chutney recipe in marathi)
#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणी#आवळाचटणीसरिता ताई बुरडे यांची आवळा चटणी ची रेसिपी मला खूपच आवडली. आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी आवळा सुपारी, यातून आपण आवळ्याचे सेवन करतो असाच आवळा खायला आपल्याला तुरट लागतो आवळ्याची चटणी हा प्रकार मला खूप आवडला यानिमित्ताने आवळा खाल्ला जाईल चटणी ची रेसिपी पण खुप छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. घरातले सगळ्याच व्यक्तींना हा प्रकार खूप आवडला आणि चटणी बनवताच लगेच संपली. दिलेल्या रेसिपीत 2 इन्ग्रेडियंट मी माझा ऍड करून रेसिपी केली आहे. कोणाला कळलेही नाही आवळ्याची चटणी आहे. आवळा खाण्याची ही आयडीया खूपच छान आहे नक्कीच सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. थँक्स सरिता ताई तुमचीही रेसिपी मला ट्राय करून खूप आनंद झाला मी बऱ्याच फ्रेंडला ही रेसिपी दिली आहे. Chetana Bhojak -
-
स्टार फ्रुट आवळा चटणी(Star Fruit Awla Chutney Recipe In Marathi)
#SORविटामिन सी ने भरपूर पौष्टिक अशी ही चटणीचा प्रकार आहे नक्कीच ट्राय करून बघा मीही चटणी ची रेसिपी स्वतः तयार केली आहे आणि स्वतःच कॉम्बिनेशन तयार करून ही चटणी मी तयार केली आहे या चटणी मुळे आपल्याला भरपूर विटामिन सी मिळते ही चटणी कोणत्याही स्नॅक प्रकार बरोबर आपण एन्जॉय करू शकतो.स्टार फ्रुट चे फळ कट केल्यावर त्याचे तुकडे आकाशातला तारे सारखा दिसतो याला करबोळे , करमरे ,कमरक, अर्जुन फळ असेही म्हणतातहिवाळ्यात आवळे आणि हे फळ आपल्याला भरपूर मिळतात चौपाटी ,बागेच्या बाहेर, शाळेच्या बाहेर अशा प्रकारचे फळ विकायला असतात तेव्हा हे घेऊन असेच खाल्ले तरी खूप छान लागते आणि याचा चटणीतून खायला दिले तरीही आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे हाडही मजबूत होतातशरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते शरीरावर बरेच फायदे या दोन्ही फळांमुळे आपल्याला मिळते त्यामुळे ही चटणी हिवाळ्यात घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #chutneyआवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात. दिसायला जरी आकाराने लहान असला तरी त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. गोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील चटणी या की-वर्ड पासून बनविलेली आवळा चटणीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs#आंवळा#soup#Aawlaआपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, हे एकमेव असे फळ आहे की, जे शिजवल्यानंतर किंवा सुकवल्यानंतर ही त्यात असलेल्या व्हिटॅमिन सी चा नाश होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए आणि तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे समृद्ध खनिजे असतात.प्रत्येक वेळी हवामान फेर बदल झाल्यास फ्लू, सर्दी आणि खोकल्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. आवळा सूप प्यायल्याने सर्दी, खोकला आणि हंगामी ताप यासारख्या समस्यांना रोखता येते आणि लवकर आराम मिळतो.मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत,सूप प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.आवळ्यापासून सूप तयार केले या सुपाला घट्टपणा येण्यासाठी हिरव्या टोमॅटोचा ही वापर केला आहे ज्यामुळे आवळ्याचा तुरटपणा टोमॅटोचा आंबटपणा आणि काही मसाले टाकून स्वादिष्ट असे सूप तयार केलेएकदा नक्की ट्राय करून हे सूप आहारातून घेऊन बघा नक्कीच आवडेल Chetana Bhojak -
आवळा सरबत (Awla sarbat recipe in marathi)
#AAआवळ्याचे अनेक फायदे आहेत,आपण कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी त्याचा लाभ होतो,आरोग्य वर्धक फळ म्हणजे आवळा.व्हिटॅमिन सी चा स्त्रोत आवळा आहे.आवळ्याचे सगळेच पदार्थ छान होतात लागतात.मी केले आहे आवळा सरबत. Pallavi Musale -
आवळा फॅट कटर ड्रिंक (amla fat cutter drink recipe in marathi)
#GA4 #week11#amla#cooksnapअंकीता खंगर यांची रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे .पझल मधून आवळा हा वर्ड ओळखून हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
-
-
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#chutneyसंत, महात्मे आणि मनावर संपूर्ण ताबा मिळविलेल्या काही मोजक्या सन्माननीय व्यक्तींचा अपवाद वगळता थोड्याफार फरकाने आपण सर्वच लोभी असतो. आपल्याला आपले जग कसे सर्व अंगांनी आपल्या फायद्याचे हवे असते. म्हणुनच उपरोधाने म्हणतात ना, माणसाला गाय कशी हवी असते? तांबड्या रंगाची, आखूड शिंगाची, कमी चारा खाणारी, जास्त दुध देणारी...अशी. दहाही बोटे तुपात आणि डोके कढईत अशी आपली चैनीची कल्पना. मुळात आपल्या चैनीच्या साऱ्या कल्पना खाण्यापाशी येवून थांबतात.अशा परीकल्पनांना पुरून उरणारी 'आवळा' ही एक वनस्पती. तिच्या फळांनी ती हरप्रकारे आपल्या उपयोगी पडत असते. कफ-पित्त-वात यातील कोणत्याही विकारावर औषध म्हणून तसेच तरुण दिसण्यासाठी केसांपासून, त्वचेपर्यंत सर्वांगास उपयोगी असते. केसांचे तेल, शॅम्पू, साबण, सौंदर्यप्रसाधने, च्यवनप्राश, आयुर्वेदिक औषधे या सर्वात समाविष्ट होते. या शिवाय लोणचे, मोरावळा, सरबत, कँडी, चुर्ण, सुपारी... जे जे शक्य ते सारे आपण आवळ्या पासुन बनवतो. पण आपले लोभी मन इतक्याने समाधान पावणार कसे? म्हणूनच या लांबलचक यादीमध्ये भर घालण्यासाठी सादर आहे 'आवळ्याची चटणी'!उगाच ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? आवळ्याचा सिझन सुरू झालाच आहे, एकदा करुनच पहा! Ashwini Vaibhav Raut -
कोथंबीर पुदिन्याची चटणी (kothimbir pudina chutney recipe in marathi)
#cn चटणीचा प्रत्येक चाट मध्ये किंवा स्नॅक्स मध्ये वापर होतो. चटणी अनेक प्रकारच्या असतात पण ही चटणी जास्त प्रमाणात वापरली जाते. Reshma Sachin Durgude -
-
आवळा सूप (awla soup recipe in marathi)
#hs सूप प्लॅनर बुधवारची रेसिपी आहे आवळा सूप. आवळ्यामधे क जीवनसत्व मोठया प्रमाणात असते. आवळ्याच्या सेवनाने शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.त्वचा रोगावर, डोके दुखी, आम्लपित्त चक्कर येणे, पोट साफ न होणे ह्या साठी आवळा खूप गुणकारी आहे. Shama Mangale -
-
-
-
-
"आवळा सूप" (awla soup recipe in marathi)
#hs#सुप_प्लॅनर#बुधवार_आवळा सूप बहुमोल आवळा_हे सूप खुप छान लागते व खरच आत्मा थंड थंड होतो.आणि रेसिपी एकदम सोपी, सुटसुटीत, झटकन होणारी.. पटकन संपणारी.. अगदी पाच मिनिटांत होणारी रेसिपी काय आहे चला तर मग बघुया.. लता धानापुने -
गवारीची चटणी
#चटणीगवारी ची आपण भाजी करतो वेगवेगळ्या प्रकारे करतो पण आज आपण गवारीची चटणी करणार आहोत उत्तम अशी चव लागते Vaishali Karande -
-
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕 Vasudha Gudhe -
आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)
#EB6#week6#आवळा किती बहुगुणी आहे हे माहिती आहेच.आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन Cअसते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.अॅन्टीऑक्सिडंट आहे.कॅल्शियम चा उत्तम स्त्रोत आहे.पित्त नाशक आहे.असा आवळा वर्षभर मिळत नाही मग तुम्ही कॅन्डी करून ठेवा वर्षभर रहाते. Hema Wane -
-
-
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
नारळ रस आणि कोकम रस यांचे मिश्रण म्हणजे सोलकढी! कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मांसाहारासारखे पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात सोलकढी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आणि नारळाच्या दूधामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी उत्तम ठरते.ही सोलकढी भातासोबत छान लागतेच पण तुम्ही ती जेवणानंतर नुसती पण पिऊ शकता.. Sanskruti Gaonkar -
चटपटीत आवळा (awla recipe in marathi)
#HLR#हेल्दी रेसिपी#चटपटीत आवळादिवाळी झाल्या नंतर फराळाचे खावून कंटाळा आला की, काहीतरी चटपटीत आणि पौष्टिक खावेसे वाटे त्यासाठी खास हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहुयात कशी करायची..... Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11448387
टिप्पण्या