शिंगोरी आमटी

Anuja Pandit Jaybhaye
Anuja Pandit Jaybhaye @cook_19620906

#goldenapron
#week 2
ओळखलेले शब्द- डाळ, बाजरी
..
तर सखींनो पुन्हा एकदा थंडीने आपल्याला गारठून टाकले आहे.
मग या गुलाबी थंडीत काही मस्त खावेसे, प्यावेसे वाटते,
हो की नाही.....
..
पण हल्ली आपण खुप health conscious झालो आहोत.
आणि आजची lifestyle पाहता तसे होणे गरजेचे सुद्धा आहे.
..
म्हणूनच आजची माझी रेसिपी मी dedicate करते माझ्या सारख्या चमचमीत, झणझणीत, चटकदार खाणा-या सखींना आणि त्याच बरोबर fit and fine राहणा-या मैत्रीणींना......
..
माझी आजची रेसिपी 2 in 1 आहे.
..
चटकदार आणि हेल्थी....
तर चला ,
आपण या शिंगोरी आमटी चे साहित्य आणि कृती पाहूया.

शिंगोरी आमटी

#goldenapron
#week 2
ओळखलेले शब्द- डाळ, बाजरी
..
तर सखींनो पुन्हा एकदा थंडीने आपल्याला गारठून टाकले आहे.
मग या गुलाबी थंडीत काही मस्त खावेसे, प्यावेसे वाटते,
हो की नाही.....
..
पण हल्ली आपण खुप health conscious झालो आहोत.
आणि आजची lifestyle पाहता तसे होणे गरजेचे सुद्धा आहे.
..
म्हणूनच आजची माझी रेसिपी मी dedicate करते माझ्या सारख्या चमचमीत, झणझणीत, चटकदार खाणा-या सखींना आणि त्याच बरोबर fit and fine राहणा-या मैत्रीणींना......
..
माझी आजची रेसिपी 2 in 1 आहे.
..
चटकदार आणि हेल्थी....
तर चला ,
आपण या शिंगोरी आमटी चे साहित्य आणि कृती पाहूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. (हिरवे वाटण साहित्य)
  2. १ इंच आलं
  3. १०-१२ लसूण पाकळ्या
  4. छोटा तुकडा सुुके खोबरे
  5. वाटीभर कोथिंबीर
  6. (भाजलेले वाटण साहित्य)
  7. १ वाटी चणा डाळ
  8. १/२ वाटी बाजरी
  9. १ टेबलस्पून धणे
  10. कांदा
  11. ८-९ हिरव्या मिरच्या
  12. आणि
  13. १/२ टीस्पून हळद
  14. १ टेबलस्पून मीठ
  15. २ टेबलस्पून तेल
  16. २ कप पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम आलं, लसूण पाकळ्या, कोथिंबीर,सुक्या खोबऱ्याचा तुकडा (चिरून) हे सर्व पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यावे.

  2. 2

    एक कांदा थोडासा फोडून शेगडीवर छान खरपूस मध्यम आचेवर भाजून घ्यावा. (Direct शेगडीवर भाजल्याने कांद्याला छान Smokey flavour येतो.)

  3. 3

    कढईत जरासे तेल घालून त्यात अनुक्रमे हिरव्या मिरच्या, धणे, चणा डाळ, बाजरी सर्व एक एक करून (वरील प्रमाण घेऊन)मध्यम गॅसवर भाजून घ्यावे.
    भाजलेला कांदा देखील पुन्हा एकदा कढईत १ मिनीटासाठी भाजून घ्यावा.
    आणि हे सर्व थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    आता एका पसरट टोपात तेल गरम करून त्यात वाटलेले हिरवे वाटण आणि हळद घालून १ मिनीटभर छान परतून घ्यावे.
    नंतर त्यात भाजून वाटलेले वाटप घालून छान मिक्स करावे.
    आता त्यात २ कपभर पाणी घालून एकजीव करून घ्यावे. (पाणी तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करून शकता)
    शेवटी त्यात मीठ घालून ७-८ मिनीटे छान उकळी काढून घ्यावी.

  5. 5

    आणि आता आपली नगर जिल्ह्यातील शिंगोरी गावातील प्रसिद्ध अशी शिंगोरी आमटी तयार..........
    ही आमटी तुम्ही पोळी, भात किंवा नुसते सुप म्हणून सुद्धा गरमागरम पिऊ शकता.

    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja Pandit Jaybhaye
Anuja Pandit Jaybhaye @cook_19620906
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes