शाही खजूर ड्राय फ्रुटस पाक

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#फ्रुट

उपवासाचा पदार्थ म्हणूनही अनेकजणं खजूर खातात.

खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते.

शाही खजूर ड्राय फ्रुटस पाक

#फ्रुट

उपवासाचा पदार्थ म्हणूनही अनेकजणं खजूर खातात.

खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
५ जणांसाठी
  1. १ वाटीखजूर बी काढून
  2. पाव वाटीपिस्ता
  3. पाव वाटीकाजू
  4. पाव वाटीबदाम
  5. पाव वाटीमनुका
  6. पाव वाटीतूप
  7. अर्धा वाटीसाखर
  8. अर्धा वाटीपाणी
  9. चमचेवेलची पावडर २

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य, कढई गरम झाली कि त्यात १ चमचा तूप टाकून बदाम, काजू, पिस्ता छान परतून घ्यावेत

  2. 2

    मनुका तुपात फुलवून घेणे

  3. 3

    १ वाटी गरम पाण्यात खजूर १५ मिनिटे भिजवावे म्हणजे लवकर छान अशी पेस्ट करता येईल

  4. 4

    थंड झालेला सुका मेवा मिक्सर मध्ये रवाळ वाटून घेणं एकदम पावडर करू नये

  5. 5

    गॅस वर अर्धी वाटी पाण्यामध्ये अर्धी वाटी साखर विरघळून घ्यावी

  6. 6

    नरम झालेला खजूर हि मिक्सर मध्ये छान वाटून घ्यावा. आता पुढ्यच्या कृती साठी हे सर्व साहित्य खजूर पेस्ट, खडबडीत वाटलेला सुका मेवा, तूप,वेलची पावडर आणि साखर पाण्यात विरघळून.

  7. 7

    कढईत १ चमचा तूप घालावे त्यात खजुराची पेस्ट घालून छान हलवावे त्यात साखरेचं पण घालून जरा मिश्रण आटवावे

  8. 8

    त्यात रवाळ सुका मेवा घालून मिश्रण छान एकत्र होई पर्यंत हलवत राहावे

  9. 9

    मिश्रण थंड झाले कि एका भांड्याला तूप लावीन किंवा बटर पेपर ठेवून हे घट्ट झालेले मिश्रण पसरवावे. सुका मेवा चे काप वरून सजवण्यासाठी वापरावे

  10. 10

    थंड वेळ फ्रीझ मध्ये ठेवून चोकोन तुकडे करून सर्व्ह करावेत.
    थंडी मध्ये एकदम उपयोगी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes